लांजा : प्रतिनिधी
तालुक्यातील पुनस गावामधील अनेक उबाठा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी किरण सामंत यांचे नेतृत्व स्वीकारले. या गावातील बौद्धवाडी, गुरववाडी, तेलीवाडी, मुस्लिमवाडी अशा विविध वाडीतील कार्यकर्त्यांनी किरण सामंत यांचे नेतृत्व या पूर्वीच स्वीकारल्यानंतर माटलवाडीच्या कट्टर उबाठा कार्यकर्त्यांनी किरण सामंत यांचे नेतृत्व स्वीकारत शिवसेना पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला.
किरण सामंत यावेळी मार्गदर्शन करत असताना म्हणाले, पालकमंत्री उदय सामंत आणि महायुतीच्या माध्यमातून जेवढा विकास निधी आला आहे. त्याच्यापेक्षा अजून विकास निधी येणारा काळात आपण आणू आणि गावात एकही विकासाचे काम शिल्लक राहणार नाही. त्याचवेळी या बैठकीदरम्यान येथे उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांचे विविध प्रश्न जागच्या जागी सोडवण्याचे काम किरण सामंत यांच्या माध्यमातून झाले. झटपट काम करण्याची पद्धत पाहून अनेकांनी पाठीशी राहण्याचा मानस व्यक्त केला. १५ वर्षात येथील आमदार गावात विकास करण्यासाठी दिसलेच नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
पुनस गावातील सर्व वाड्यांनी किरण सामंत यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत शिवसेना पक्षाचे शिवबंधन आपल्या हातात बांधले होते. मात्र अपवाद राहिलेल्या माटलवाडीतील ग्रामस्थांनी किरण सामंत यांचे नेतृत्व स्वीकारात पुन्हा एकदा खऱ्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला असून किरण सामंत यांना येणारा विधानसभेमध्ये बहुमताने विजयी करण्यासाठी आणि गाव विकसित करण्यासाठी माटलवाडीतील ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून सहा कोटी पन्नास लाख एवढा विकास निधी देण्यात आला असून त्याच्या माध्यमातून गावामध्ये विविध कामे सुरू झाली असून प्रगतीपथावर आहेत. गेल्या पंधरा ते वीस वर्षे आमच्या गावात विकासासाठी आम्ही वणवण भटकत होतो मात्र विकास कामाच्या नावावरती थापा मारण्यात आल्या. एका महिन्यामध्ये विकास निधी येऊन गावात विकासाला सुरुवात झाली. गावात एकही रस्ता शिल्लक राहणार नाही अशी काम किरण सामंत यांच्या माध्यमातून होत असताना त्यांच्या मागे भक्कमपणे उभा राहण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.
या कार्यक्रमाला तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, उपतालुकाप्रमुख श्री रेवाळे, शंकर गोरे यांच्यासहित या भागातील प्रमुख शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. ज्यांनी पक्ष प्रवेश केला त्यामध्ये रामचंद्र राहाटे, हरिश्चंद्र कुंभार, केशव माटल ,सुरेश माटल ,शांताराम सावंत, सरस्वती म्हड्ये,अंकिता कुंभार, मनोज कांबळे, दीपक कांबळे, उमेश कांबळे, नितेश कांबळे, मनीष कांबळे, माधवी कांबळे, मीना कांबळे, वसंत गुरव, जय सावंत या प्रमुख पदाधिकारी सहित वाडीतील शेकडो ग्रामस्थांनी शिवसेना पक्ष प्रवेश केला आहे