मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक १ ऑक्टोबरपासून ते ७ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारून ऑनलाईन काम बंद ठेवण्यात येणार असून दिनांक ७ ऑक्टोबर ला मुंबई येथे आझाद मैदान येथे एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सरकार लाडकी बहीण लाडका भाऊ अशा अनेक योजना काढत आहे मात्र आरोग्य विभागात कोरोना सारख्या महामारीला सुरक्षा कवच बनून अनेक लोकांचे प्राण वाचवून उपचार दिलेल्या कोरोनायोद्धा यांच्या छोट्या छोट्या मागण्या मान्य करायला आरोग्य मंत्री व मुख्यमंत्री दुर्लक्ष करत आहेत.
१० हजार ७०० समुदाय आरोग्य अधिकारी हे २०१६ पासून उपकेंद्र येथे कार्यरत आहेत. केंद्र शासनाने आयुष्यमान भारत हा अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक केली व व ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थाला प्राधान्य दिले. त्या आयुष्मान भारत या महत्वाकांक्षी प्रकल्पला योग्य न्याय देण्याचा नेहमी मनापासून प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे आरोग्यमंत्री यांच्या माता सुरक्षित घर सुरक्षित, जागरूक पालक सुदृढ बालक, निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे अशा विविध आरोग्य विभागाच्या अभियानाला समुदाय आरोग्य अधिकारी यांनी ऑनलाईन व ऑफलाइन कामे करून न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. कोरोना काळात दोन ते तीन वर्ष महाराष्ट्र मधील समुदाय आरोग्य अधिकारी यांनी कोरोना बाधित रुग्णाच्या प्रत्यक्ष संपर्कामध्ये राहून सेवा दिली तरीसुद्धा अन्याय होत राहिला आहे त्यामुळे आम्हाला आंदोलनाचे पाऊल उचलावे लागत आहे. प्रमुख मागण्या खालील प्रमाणे- पदनिर्मिती व सेवा समायोजन करून गट ‘ब’ चा दर्जा देण्यात यावा, सरसकट मानधन ५५ हजार प्रति महिना देण्यात यावा व त्यावर दरवर्षी ५ % वाढ द्यावी, अतिरिक्त उपकेंद्रचा पदभार दिल्यास त्याचे पंधरा हजार रुपये प्रति महिना द्यावा, टप्पा- टप्प्याने आयुष्यमान आरोग्य मंदिर कार्यान्वित केल्याने बरेचसे समुदाय आरोग्य अधिकारी यांना गृह जिल्हा सोडून इतर जिल्हा सेवा द्यावी लागत आहे त्यामुळे त्यांना लवकरात लवकर बदली धोरण करून लागू करावे व योग्य ते न्याय द्यावा, इतर कर्मचारी प्रमाणे समुदाय आरोग्य अधिकारी सुद्धा आरोग्य सेवा देत असताना त्यांना प्रवासाचा खर्च स्वतः करावे लागत असल्यामुळे त्यांना प्रवास भत्ता देऊन विमा कवच सुद्धा लागू करण्यात यावे. व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीने १ ऑक्टोबर पासून कामबंद आंदोलन पुकारण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनाचे राज्याध्यक्ष डॉ अंकुश मानकर , राज्यउपाध्यक्ष अजिंक्य शेळके , जिल्हाध्यक्ष डॉ राकेश येरणे , जिल्हा महिला प्रतिनिधी डॉ स्वाती कामडी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ मनिष रोहणकर, जिल्हा सल्लागार डॉ मधुकर पटले यांनी दिली आहे.




