रत्नागिरी – विशेष प्रतिनिधी रत्नागिरी – सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसघांतून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, राष्ट्रवादी, रासप, रयत क्रांती व मित्र पक्षांकडून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी शुक्रवारी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांनी प्रचार रॅली काढून घोषणा देत आसमंत दुमदुमून सोडला. आपण अडीच लाख मतांनी विजयी होऊ असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला.
यावेळी नारायण राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प केला आहे की यावेळी भाजप आणि मित्रपक्ष मिळून ‘अब की पार चारशे पार’ यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार असायला हवा विकसित भारतासाठी मोदी हॅटट्रिक साधत तिसर्यांदा पंतप्रधान होतील. रत्नागिरी सिंधुदुर्गचा महायुतीचा खासदार अडीच लाखपेक्षा जास्त मतांनी निवडून द्याल, यासाठी तुमच्या तोंडात साखर पडो असा विश्वास राणे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री दीपक केसरकर, रवींद्र चव्हाण, किरण सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.
नारायण राणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थिती असलेले किरण सामंत यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया देताना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांचे काम करून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचं आहे. मी माझ्या प्रचाराची रणनीती ठरवली होती. त्याच पद्धतीने राणे यांनीही प्रचाराची रणनीती आखली असेल. जास्तीत जास्त मताधिक्याने ते निवडून येतील. कालच झालेल्या बैठकीत चर्चेत सगळे संभ्रम आता दूर झाले आहेत. आपण कुठेही नाराज नाही आणि म्हणूनच या ठिकाणी उपस्थित आहोत. राणेसाहेबांबरोबर आहोत, अशी प्रतिक्रिया किरण सामंत यांनी दिली आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकला क्लिक करा.https://youtu.be/15IIqUT6UYY?si=HPI7HkCUE-tHvj8C