• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणूक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुतोवाच, युतीचे जागावाटप लवकरच ठरणार

yogesh by yogesh
September 16, 2024
in माझा महाराष्ट्र
A A
0

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात घेतली जाऊ शकते, असे सुतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केले. या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोण किती जागा लढविणार, याबाबतचा अंतिम निर्णय येत्या आठ ते दहा दिवसांत जाहीर करण्यात येईल, असे ते म्हणाले. २८८ सदस्यीय राज्य विधानसभेसाठी दोन टप्प्यांत निवडणूक घेतली जाऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेले महायुतीचे सरकार सातत्याने विकास आणि कल्याणकारी योजनांवर काम करीत आहे आणि या योजनांना राज्यातील जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. आम्ही जागा वाटपावर चर्चा सुरू केली आहे. यासाठी गुणवत्ता आणि विजयाची खात्री हा महत्त्वाचा असणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांचा महायुतीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. माझे सरकार सर्वसामान्यांचे आहे. विकास आणि कल्याणकारी योजना यात आम्ही अचूक समतोल साधला आहे. कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग म्हणून आमच्या सरकारने दीड लाख युवकांना नियुक्तिपत्रे दिली असून, त्या अंतर्गत त्यांना ६, १०हजार स्टायपंड दिले जात आहे. या योजनेंतर्गत राज्यातील १० लाख युवकांना समाविष्ट करण्यावर आमचा भर असणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. तर राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत १.६० कोटी महिलांना लाभ मिळत आहे. ही योजना अडीच कोटी महिलांपर्यंत पोहोचविण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून लवकरच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. त्यांच्याकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आगोयाकडून हालचाली सुरु होतील. राज्यात मागील अनेक वर्ष एकाच टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. पण सध्या राज्यात आंदोलनांचा जोर वाढलेला असल्याने कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. २००४ पासून राज्यात विधानसभेच्या चार निवडणुका झाल्या. चारही वेळा एकाच टप्प्यात मतदान झाले. २९ ऑगस्टला गुप्तचर विभागातील सुत्रांच्या हवाल्याने दोन टप्प्यात निवडणूक होणार असल्याचे वृत्त आहे. १२ ते १८ नोव्हेंबरदरम्यान निवडणूक होणार असल्याचे समजते. २०१९ मध्ये राज्यात विधानसभेची निवडणूक झाली होती. ती एकाच टप्प्यात झालेली होती. महाराष्ट्र, हरयाणात एकाचवेळी निवडणूक झाली. पण यंदा हरयाणात आधी निवडणूक होत आहे. तर महाराष्ट्रातील निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. आता मुख्यमंत्र्यांनीच याबद्दल महत्त्वाचे संकेत दिले आहेत. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

Tags: निवडणूकमहायुतीविधानसभा
ShareSend
Previous Post

मिऱ्या एमआयडीसीला आकसापोटी विरोध : ना. सामंत

Next Post

देवस्थानच्या इनामी जमिनी मालकीहक्कात देण्याचा निर्णय रद्द करावा

yogesh

yogesh

Related Posts

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती
माझा महाराष्ट्र

ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

March 2, 2026
मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर
माझा महाराष्ट्र

मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर

February 20, 2026
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझा महाराष्ट्र

मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 18, 2026
Next Post
देवस्थानच्या इनामी जमिनी मालकीहक्कात  देण्याचा निर्णय रद्द करावा

देवस्थानच्या इनामी जमिनी मालकीहक्कात देण्याचा निर्णय रद्द करावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us