रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १७९ पदांची भरती सुरू असून या भरतीत ९० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असलेली ऑनलाइन परीक्षा होणार होती. त्यानुसार दिनांक १ सप्टेंबर रोजी खेड तालुक्यातील लवेल येथील केंद्रावर सावळा गोंधळ पाहायला मिळाला. नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्याने परीक्षा आता होणार नाही पुन्हा घेण्यात येईल असे बँकेच्या तेथे उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांनी उमेदवारांना सांगितले. त्यानंतर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या उमेदवारांच्या पदरी निराशा पडली आहे. आधीच कित्येक किलोमीटरचा प्रवास करून त्याचा खर्च करून परीक्षा द्यायला आलेले उमेदवार पुन्हा तितका भुर्दंड घालून का यावेत? असा सवाल उपस्थित होत आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँक ऑनलाईन परीक्षा घेणार होती, तर त्याचे नियोजन करण्यात अपयशी का ठरली ? की परीक्षा घ्यायचे नाटक बँक करत आहे? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बँकेची परीक्षा दिनांक १ सप्टेंबर रोजी होतो. त्यामुळे अनेक उमेदवार प्रवास करून खेड तालुक्यातील लवेल येथील केंद्रावर पोहचले. तिथे उमेदवारांना सावळा गोंधळ पाहायला मिळाला. नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्याने परीक्षा आता होणार नाही पुन्हा घेण्यात येईल असे बँकेच्या तेथे उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांनी उमेदवारांना सांगितले. परंतु ही परीक्षा पुन्हा कधी होणार? फुकट गेलेला प्रवास खर्च कोण देणार? असे अनेक प्रश्न उमेदवारांना पडले. त्याची उत्तरे इथे उपस्थित बँक अधिकारी देण्यास टाळाटाळ करत होते. त्यामुळे आक्रमक उमेदवारांनी गोंधळ घातला. जिल्हा बँकेच्या भरतीत असा सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे.
पारदर्शक कारभार करणारी बँक कुचकामी का ठरतेय ?
बँकेची भरती पारदर्शक होते, अश्या वल्गना करणारी बँक कुचकामी का ठरतेय? असा सवाल या कारभाराकडे पाहून उपस्थित होत आहे. परीक्षा नियोजन करताना सर्व खबरदारी घेता येत नाही का? की परीक्षा फक्त दिखावा आहे? असे सवाल उपस्थित होत आहेत