रत्नागिरी : प्रतिनिधी
सोमवारी सकाळच्या सुमारास रत्नागिरीत झालेल्या युवती अत्याचार प्रकरणाच्या तपासाकरिता ११ सदस्यांचा समावेश असलेल्या विशेष तपास पथक अर्थात एसआयटीचे गठन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
सोमवारी जिल्ह्यात संतप्त पडसाद उमटलेल्या युवती अत्याचाराच्या तपासासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करण्याचा निर्धार पोलीस दलाने केले आहे. यासाठी ११ सदस्यांचा समावेश असलेल्या विशेष तपास पथक नेमल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांनी मंगळवारी माध्यमांना दिली. या प्रकरणाची पाळीमुळे खणून दोषीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी पीडित युवतीच्या संपर्कात आलेल्या चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून नागरिकांनी संयम बाळगावा असे आवाहन पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी केले आहे.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयात सोमवार सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी खबरदारी म्हणून अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आल्याची माहिती देखील एसपींनी यावेळी दिली.