रत्नागिरी : प्रतिनिधी
बांग्लादेशातील हिंदुंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात साऱ्या जगातून निषेध नोंदवण्यात येत आहे. हिंदूंवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही. याकरिता हिंदू समाज संघटित झाला आहे. हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ २९ ऑगस्ट रोजी सकाळी ठिक १०.०० वाजता हिंदु गर्जना मोर्चाचे आयोजन केलेले आहे. हा मोर्चा शिवतीर्थ मारुती मंदिर रत्नागिरी येथून चालू होऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपेल. तसेच यादिवशी दुपारपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून रत्नागिरी जिल्हा बंदची हाक दिलेली आहे.
जागृत हिंदूंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अखंड भारताचा बांग्लादेश हा एक खंडित भाग आहे बांग्लादेशाची लोकसंख्या आज २८ करोड आहे. बांग्लादेश स्वतंत्र झाला त्यावेळी हिंदुची लोकसंख्या २७% होती आज ती ९% म्हणजे अंदाजे १ कोटी ३० लाखांच्या आसपास झाली आहे. या विश्वात राहणारा प्रत्येक हिंदू बांधवाचे प्रत्येक हिंदु बांधवाशी भावनिक नाते आहे. गेले १५ ते २० दिवस बांग्लादेश मध्ये हिंदुचा जो नरसंहार चालु आहे तो फार भयानक आहे. ६४ जिल्हयापैकी ५२ जिल्हयामध्ये हिंदुवर अन्यवित अत्याचार इस्लामिक कंट्टरपंथी लोकांनी केले आहेत. हिंदुना घरात कोंडुन आग लावणे, हिंदुना लटकवुन मारणे. हिंदुची घरे जाळली जात आहेत. स्त्रियांवर अन्यवित अत्याचार,बलात्कार केले जात आहेत. माहितीनुसार एका हिंदु स्त्री वरती ३५ धर्माधांनी अत्याचार केले आहेत . हयाच इस्लामिक कट्टरपंथी लोकांना जेवायला देणारे इस्कॉनची मंदिर जाळले गेले. कालिमातेची ४ मंदिरे तोडली गेली. तसेच बौध्द धर्मियांची प्रार्थनास्थळे देखील जाळण्यात आली. एवढेच नाही तर हिंदुचा धर्मग्रंथ भगवतगीता जाळण्यात आला. हिंदुवर जिझियाकर लावण्यासाठी फत्तवा काढण्यात आलेला आहे. ५,००,०००/- (पाच लाख रुपये) दया तर बांग्लादेशामध्ये राहता येईल. आतातर हिंदुच्या नोकऱ्या देखील घालविण्यात येत आहेत. जबरदस्ती राजीनामे घेतले जात आहेत. धर्मपरीवर्तन करा, देश सोडा किंवा मरायला तयार व्हा. अशा प्रकारच्या घोषणा देण्यात येत आहेत.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, बांग्लादेशवरील U.N.च्या रिपोर्टनुसार १९७१ साली २० लाख हिंदुना मारले गेले, १९९२ साली २८ हजार हिंदुची घरे जाळण्यात आली २५० स्त्रियांवरती अत्याचार करण्यात आले. १९७८ साली १९८९ साली व आता २०२४ साली सनातनी हिंदुवरती अत्याचार करण्यात येत आहेत. दरवर्षी अंदाजे २,३०, ६१२ हिंदु बांग्लादेशमधून गायब होत आहेत. म्हणजेच अंदाजे ६३२ हिंदु पळवुन लावले जात आहेत. ४८ जिल्हयामध्ये २७८ जागी हिंदुवर हल्ले झाले . २ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट या ४ दिवसांमध्ये २०५ ठिकाणी हल्ले झालेत आजपर्यंत अंदाजे ६५० हिंदुना मारले गेले आहे. २०१३ ते २०२४ पर्यंत १६७० वेळा हिंदुच्या मंदिरावर हल्ले करण्यात आले. त्यामुळे रत्नागिरीत गर्जना मोर्चा काढला जाणार आहे.