• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा हिंदुस्थान

बांगलादेशातील मंदिरे आणि हिंदूंच्या रक्षणासाठी पावले उचला!

yogesh by yogesh
August 8, 2024
in माझा हिंदुस्थान
A A
0

हिंदु जनजागृती समितीची हिंदुस्थान सरकारकडे मागणी

रत्नागिरी : प्रतिनिधी

बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे. सरकारविरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले आहे. जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमणे करणे, हिंदूंची दुकाने लुटणे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे-आग लावणे, हिंदु महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहे. या गोष्टींमुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात बांगलादेशी सैन्यदलाने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असेल, तरी हिंदुस्थान सरकारने त्यावर विसंबून न रहाता हिंदु समाजाच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समिती पुढील मागण्या केल्या आहेत. प्रथम बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले, घरांची लूट, मंदिरांवरील हल्ले, मूर्तींची तोडफोड, महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी तेथील सैन्य दलाला कठोर सूचना द्याव्यात. बांगलादेशातील हिंदूंवरील वाढते हल्ले लक्षात घेता तेथील हिंदूंना सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि त्यांना तातडीने सुरक्षा पुरवावी. आतापर्यंत तेथील हिंदूंच्या जीवित वा मालमत्ता यांची जी हानी झाली असेल, त्याची तातडीने भरपाई करावी. भारत सरकारने हा विषय तातडीने ‘संयुक्त राष्ट्र संघा’त मांडून बांगलादेशामध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या शिष्टमंडळाला भेट देण्याची मागणी करावी. बांगलादेशातील हिंसाचारामुळे तेथील जे हिंदु विस्थापित होऊन भारतात आश्रय मागत असतील, त्यांना ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’द्वारे (सीएए) हिंदुस्थान सरकारने आश्रय द्यावा. तसेच यापूर्वीही जवळपास ५ कोटी बांगलादेशी घुसखोर भारतात शिरले आहेत, या घटनेनंतर पुन्हा ही घुसखोरी वाढण्याची शक्यता पहाता सीमेवर चोख बंदोबस्त करावा.

‘सोशल मिडीया’च्या माध्यमातून बांगलादेशातील अत्याचाराचे जे भयंकर व्हिडिओ समोर येत आहेत, त्यावरून हिंदुस्थान सरकारने वेळीच लक्ष घातले नाही, तर बांगलादेश हा दुसरा पाकिस्तान होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी हिंदूंचा मोठ्या प्रमाणात नरसंहार होण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर धर्मांध जिहादी आतंकवाद्यांचे मनोबल वाढून ते भारतातही त्याच्या छुप्या पाठिराख्यांच्या मदतीने हिंसाचार माजवण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय पोलीस यंत्रणा, प्रशासन यांच्यासह समस्त हिंदुस्थानी जनतेने सतर्क रहायला हवे. तसेच स्वसंरक्षणासाठी सिद्ध रहाण्याचीही आवश्यकता असल्याचे समितीने म्हटले आहे.

Tags: सकल हिंदू समाजसनातनहिंदूहिंदू जनजागृती समिती
ShareSend
Previous Post

सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचे ‘एक ना धड भाराभर चिंध्या’!

Next Post

रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ८१ हजार मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी

yogesh

yogesh

Related Posts

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 
माझा हिंदुस्थान

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 

July 23, 2025
तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!
माझा हिंदुस्थान

तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!

July 19, 2025
हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 
माझा हिंदुस्थान

हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 

May 24, 2025
जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी
माझा हिंदुस्थान

जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी

May 24, 2025
Next Post

रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ८१ हजार मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us