• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा हिंदुस्थान

श्याम मानव यांची जादूटोणा कायदा समितीतून हकालपट्टी करा!

yogesh by yogesh
July 28, 2024
in माझा हिंदुस्थान
A A
0

हिंदु जनजागृती समितीची शासनाकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी

तत्कालीन काँग्रेस शासनाने जादूटोणा कायद्याच्या प्रचारासाठी नेमलेल्या शासकीय समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव हे आजही त्या समितीवर कार्यरत आहेत. खरे तर मानव यांनी खोटे लिखाण केले, म्हणून त्यांना न्यायालयाने शिक्षा आणि आर्थिक दंड ठोठावला होता. तसेच ते सातत्याने वारकरी संप्रदायातील साधूसंतांवर जातीयवादी भाषेत टीका करून धार्मिक भावना दुखावण्याचे काम करत असतात. त्यामुळे या शासकीय समितीतून श्याम मानव यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

पुणे येथील सुप्रसिद्ध डॉ.प.वि. वर्तक यांच्याविषयी खोटे लिखाण प्रसिद्ध केल्याविषयी पुणे येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. पाध्ये यांच्या न्यायालयाने प्रा. श्याम मानव यांना एक दिवसाची कैद आणि आर्थिक दंड ठोठावला होता. ‘मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम १९५०’च्या कलम ५६ अन्वये फौजदारी गुन्हा सिद्ध झालेल्या व्यक्तीला कोणत्याही सार्वजनिक समिती वा न्यासावर सदस्य म्हणून राहता येत नाही. तसे असल्यास ते पद आपोआप रहित होते. त्यामुळे शासनाने कायद्याच्या समितीत मानव यांना घेणे बेकायदेशीर आहे. हिंदु धर्म, संत परंपरा यांविषयी द्वेष बाळगणारे मानव यांनी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित जादूटोणा कायद्याच्या जनजागृती कार्यक्रमात ‘ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवले, हे धादांत खोटे सांगितले जात आहे’, अशा प्रकारची अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. यापूर्वीही ‘कुलकर्ण्यांचं १२ वर्षांचं पोरं (संत ज्ञानेश्वर महाराज) भिंत काय चालवणार?’, ‘संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले नसून त्यांचा खून झाला आहे’, अशा प्रकारची वारकर्‍यांसह महाराष्ट्राच्या धार्मिक भावना दुखावणारी अनेक आक्षेपार्ह आणि जातीयवादी विधाने करत असतात. हा नेमका कोणत्या जादूटोणा कायद्याचा प्रचार आहे? हा कायद्याचा प्रचार नसून वारकर्‍यांच्या जाणीवपूर्वक श्रद्धाभंजनाचा अघोरी प्रकार आहे. सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून हिंदु संतांची बदनामी करणार्‍या श्याम मानव यांची तात्काळ हकालपट्टी झाली पाहिजे.

समाजसेवकाचे मुखवटा घातलेल्या ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने (‘अंनिस’ने) त्यांच्या ट्रस्टमध्ये अनेक आर्थिक घोटाळे केले आहेत. त्याच्या रितसर तक्रारी झालेल्या आहेत. ‘अंनिस’ने तर शासनाची फसवणूक करून लाखो रुपयांचे अंशदान बुडवले आहे. विदेशांतून लाखो रुपये घेऊन त्याचा हिशेब न दिल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने अंनिसची FCRA (विदेशी मुद्रा) नोंदणी रहित केली आहे. ‘अंनिस’च्या ट्रस्टवर प्रशासक नेमण्याची शिफारस साहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी केली आहे. या सर्व प्रकारांची शासकीय स्तरावर सखोल चौकशी चालू आहे. या संघटनेच्या कार्यकर्त्यांना नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याप्रकरणी अटका देखील झाल्या आहेत. अशा भ्रष्ट, घोटाळेबाज, अर्बन नक्षली संघटनांना आणि त्यांच्या पदाधिकार्‍यांना शासकीय समित्यांमध्ये स्थान मिळणे, अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे श्याम मानव यांच्याप्रमाणे या संघटनेतील पदाधिकार्‍यांनाही शासकीय समितीतून तात्काळ बाहेर काढावे व ती समिती बरखास्त करावी, अशी हिंदु जनजागृती समितीची मागणी आहे.

Tags: सनातनहिंदुत्ववादीहिंदूहिंदू जनजागृती समिती
ShareSend
Previous Post

विशाळगडावरील अतिक्रमणांकडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष

Next Post

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी रत्नकन्या गौरी विलणकर रवाना

yogesh

yogesh

Related Posts

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 
माझा हिंदुस्थान

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 

July 23, 2025
तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!
माझा हिंदुस्थान

तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!

July 19, 2025
हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 
माझा हिंदुस्थान

हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 

May 24, 2025
जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी
माझा हिंदुस्थान

जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी

May 24, 2025
Next Post

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी रत्नकन्या गौरी विलणकर रवाना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us