• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

राजापूर आणि कामथे येथे होणार सोनाग्राफी सेंटर : ना. उदय सामंत

yogesh by yogesh
July 25, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

आरोग्यविषयक अडीअडचणीबाबत पालकमंत्र्यांची निवडणूकपूर्व बैठक

रत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्ह्यातील कामथे आणि राजापूर या ठिकाणी सोनोग्राफी सेंटर करण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्याचबरोबर कॅन्सर प्रीडीटेक्शन युनिट सेंटर जिल्ह्यात सुरु करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात सामंत यांनी ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन बसविण्याबाबत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शासकीय रुग्णालय अडीअडचणीबाबत निवडणूकपूर्व बैठक घेतली. 

बैठकीला  अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, कोल्हापूर उपसंचालक कार्यालयातील सहायक संचालक डॉ. सतीश सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, डॉ. निनाद नाफडे, डॉ. निलेश नाफडे आदी उपस्थित होते.

सामंत यावेळी म्हणाले, सोनोग्राफी केंद्रासाठी सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे मानधन तातडीने त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याबाबत प्रस्ताव तयार करुन जिल्हा नियोजन समितीकडे निधी मागणीसाठी द्यावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने जागेची पाहणी करुन पायाभूत सुविधा उभ्या कराव्यात. औषध खरेदीसाठी १० कोटी आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या  पायाभूत सुविधांसाठी ३० कोटी दिले आहेत. याबाबतची कार्यवही तातडीने सुरु करावी.
जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे ९ डॉक्टर्स होते. गेल्या वर्षी सुरु झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी २१ डॉक्टर्सची भरती झाली आहे. आणखी एक भूलतज्ज्ञदेखील उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सद्यस्थितीत जिल्हा शासकीय रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरण झाल्याने रुग्णांच्या सेवेसाठी ३० डॉक्टर्स उपलब्ध झाल्याचे पालकमंत्री सामंत म्हणाले. जी सुविधा शासनाने रुग्णांसाठी दिली आहे. ती तातडीने मिळाली पाहिजे, त्यासाठी अधिष्ठाता आणि जिल्हा शल्यचिकीत्सक यांनी युध्दपातळीवर काम करावे. आरोग्य क्षेत्रात चांगले काम करणे आवश्यक आहे. त्यात सुधारणा झाली पाहिजे. सिझेरियनची संख्या कमी करुन नैसर्गिक डिलीव्हरी होण्याच्या प्रमाणात वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रलंबित असणारी वैद्यकीय बिले तातडीने मार्गी लावावीत. सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांबाबत कडक कारवाई करावी, असेही पालकमंत्री म्हणाले. मनोरुग्णालयाला मंजूर करण्यात आलेल्या १४ कोटींच्या निधीबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला.

Tags: आरोग्यउदय सामंतबैठक
ShareSend
Previous Post

निर्मात्याची फसवणूक, जरांगे विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

Next Post

विशाळगडावरील अतिक्रमणांकडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post

विशाळगडावरील अतिक्रमणांकडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us