शाळेतील ५०० चिमुकले बनले वारकरी
रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयातील बालदोस्तांनी मंगळवारी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकरी दिंडीचा आनंद घेतला. या दिंडीत सुमारे पाचशे विद्यार्थी सहभागी झाले होते. विठ्ठल रखुमाईच्या पोशाखातील बालदोस्तांना पाहण्याचा आनंद अवर्णनीय होता.

दरवर्षीप्रमाणे या वर्षी बालवाडी विभागाने या दिंडीचे आयोजन केले होते. पालखीत बसलेल्या विठू माऊलीची बालदोस्तांनी वाजत गाजत दिंडी काढली. नऊवारी साङ्या आणि पांढरा झब्बा लेंगा अशा वारकारी पोशाखातील चिमुकल्यांना पाहण्याचा आनंद यानिमित्त सर्व विद्यार्थी व पालकांना घेता आला. मुख्याध्यापिका सौ. निलम जाधव व बालवाडी विभागप्रमुख रश्मी लेले यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे सर्व शिक्षक व पालकाने विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.




