• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Saturday, August 1, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

आ. किरण सामंतांकडून धोकादायक आंबा घाटाची पाहणी

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

yogesh by yogesh
August 1, 2026
in माझी रत्नागिरी
A A
0
आ. किरण सामंतांकडून धोकादायक आंबा घाटाची पाहणी

साखरपा : प्रतिनिधी 

गेल्या दोन आठवड्यांपासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता वाहतूक व्यवस्थेलाही बसू लागला आहे. कोल्हापूर–रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वरील आंबा घाटात काही ठिकाणी रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने रस्ता खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने आंबा घाटातून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. आंबा घाटातील रस्ता धोकादायक स्थितीत असल्याची माहिती मिळताच लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी आपल्या नियोजित दौऱ्यात बदल करून तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची सविस्तर माहिती घेत प्रत्यक्ष पाहणी केली आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या.

पाहणीदरम्यान रस्त्यावर पडलेल्या भेगा, पावसामुळे झालेली जमिनीची हालचाल आणि संभाव्य धोका याची त्यांनी पाहणी करून परिस्थिती गांभीर्याने घेतली. घाटातून दररोज मोठ्या प्रमाणात मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक होत असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. याबाबत रत्नागिरी जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्यासोबत आज सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार किरण सामंत यांनी दिली. बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून पुढील उपाययोजनांबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रस्त्याच्या सुरक्षिततेचा तांत्रिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक दुरुस्ती, वाहतुकीसंदर्भातील पुढील नियोजन तसेच पर्यायी मार्गांची व्यवस्था याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.स्थानिक नागरिकांनीही रस्त्यावरील भेगांबाबत चिंता व्यक्त करत तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मुसळधार पावसामुळे घाट परिसरात दरडी कोसळणे, माती खचणे आणि रस्त्याचे नुकसान होण्याच्या घटना वाढत असल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. आंबा घाट हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा असल्याने रस्त्याची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत असून, पुढील निर्णयाकडे वाहनचालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Tags: आंबा घाटउदय सामंतकिरण सामंत
ShareSend
Previous Post

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे ३१ जुलैपासून ‘सहकार कार्यकर्ता’ निवासी प्रशिक्षण

Next Post

नाटे ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो ग्रामस्थ शिंदेंच्या शिवसेनेत

yogesh

yogesh

Related Posts

रत्नागिरी शासकीय रुग्णालयात मोफत डायलिसीस सुविधा; रुग्णांना दिलासा
माझी रत्नागिरी

रत्नागिरी शासकीय रुग्णालयात मोफत डायलिसीस सुविधा; रुग्णांना दिलासा

August 1, 2026
नाटे ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो ग्रामस्थ शिंदेंच्या शिवसेनेत
माझी रत्नागिरी

नाटे ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो ग्रामस्थ शिंदेंच्या शिवसेनेत

August 1, 2026
एका मिनिटात ६ प्रश्न सोडवा आणि पात्र व्हा!
माझी रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे ३१ जुलैपासून ‘सहकार कार्यकर्ता’ निवासी प्रशिक्षण

July 22, 2026
रत्नागिरीत ‘बीएलओ घरोघरी’ नव्हे, मतदारच बीएलओंच्या दारी!
माझी रत्नागिरी

रत्नागिरीत ‘बीएलओ घरोघरी’ नव्हे, मतदारच बीएलओंच्या दारी!

July 21, 2026
Next Post
नाटे ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो ग्रामस्थ शिंदेंच्या शिवसेनेत

नाटे ग्रामपंचायत सदस्यासह शेकडो ग्रामस्थ शिंदेंच्या शिवसेनेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us