रत्नागिरी : प्रतिनिधी
तिकीट तपासणीस पदावर कार्यरत असणाऱ्या एका आरामाविराच्या मर्जीतील कर्मचाऱ्याला अर्थात स्पेशल पियुला विभागीय कार्यालयात बैठे काम देण्यात आले आहे. प्रत्यक्षात अन्य एक कर्मचारी सेवा ज्येष्ठ असताना आणि त्या कर्मचाऱ्याला लहान बाळ असताना फिरतीची ड्युटी देण्यात आली आहे. फक्त माझ्या मर्जीतील आहे म्हणून एकाला न्याय आणि दुसऱ्यावर अन्याय असले प्रकार एसटीत घडत आहेत. इथे टीसीला बैठे काम देण्यात आले आणि जागा रिक्त नाही सांगुन याच कार्यालयात परजिल्ह्यातून बदली होऊन आलेल्या कर्मचाऱ्याला रुजू करून घेण्यात येत नव्हते. मात्र तिथे एका मजबूत नेत्याचा दट्ट्या बसल्यावर जागा रिक्त झाली. असा अजब कारभार एसटीचा सुरु आहे. अजूनही इथे टीसीला बैठे काम देऊन एसटी कोणाची मर्जी सांभाळत आहेत हा सवाल उपस्थित होत आहे.
एसटीच्या कारभाराचे अनेक किस्से उघड होऊ लागले आहेत. असाच एक किस्सा अनेक वर्ष नावारूपास आला आहे. आरामवीर अनेकांची काशी घालत असताना त्याचा डॅशिंगपणा पाहून त्याच्या दोस्तानात एका पियूची भर पडली. आरामवीरच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीला फायद्यात आणायला ही उतावीळ असायची! टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडून आरामविराच्या कमाईची बॅटिंग जोरदार चालत असे. या बॅटिंगमध्ये या पियूचा हिस्सा जोरदार असे. आरामविराच्या खिशातील पार्टनर समजा ना! खिशात आणि मनात जास्तीचे स्थान असल्याने पगार एसटीचा आणि कारभार खासगी वाहतुकीचा अजूनही जोरदार सुरु आहे. विभागीय वाहतूक नियंत्रकांना हा कारभार दिसत नाही कि त्यांची नजर थोडी वीक आहे? हा संशोधनाचा विषय आहे! तर मूळ मुद्दा ही पियू या आरामवीरच्या आशीर्वादाने तिचे असलेले काम सोडून सोयीच्या टेबलवर डेरा टाकून बसली आहे. म्हणजे पोस्ट येगळी अन दुसराच कारभार! ‘एसटी’बी उदार अन पियू सुभेदार!
आता नियमानुसार जी पोस्ट जॉईन होताना मिळते. त्यावर प्रमोशन होऊन वेगळी वरची पोस्ट मिळू शकते. मात्र आपली पोस्ट फिरतीची असताना टेबलवर बसुन आराम करण्याची पोस्ट पदरात पाडून घ्यायची म्हणजे किती कला, कौशल्ये आणि हातभार लागला असेल, याचा हिशेब न केलेला बरा! फिरतीची ड्युटी नको ना तुला मग तू बस या टेबलावर असे कारनामे आरामवीरचे असल्याने आमचे कोणीच काही बिघडवू शकत नाही हा माज वर्तनात दिसू लागला आहे. कामाला यायचे कधी, जायचे कधी याचा पत्ता नाही. आओ जाओ घर तुम्हारा असली पद्धत असल्याने रजा घेऊन सह्या मारायचा असा कारभारही या पियूचा उघड होत आहे. यामागे आरामवीर आणि त्याचा कोणी राजकीय आका असल्याची चर्चा आहे.




