• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

बालिकेवर लैंगिक अत्याचार; वृद्धाला जन्मठेप!  

ॲड. अनुपमा ठाकूर यांचा धारदार युक्तिवाद; न्यायालयाचा प्रेरणादायी निकाल 

yogesh by yogesh
July 17, 2025
in माझी रत्नागिरी
A A
0
इसिस दहशतवादी संघटनेशी संबंधित सहा मुस्लिम गजाआड

रत्नागिरी : प्रतिनिधी 

राजापूर तालुक्यातील अवघ्या १२ वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ७७ वर्षीय आरोपी वासुदेव अर्जुन गुरव ( रा. राजापूर, जि. रत्नागिरी) याला विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी जन्मठेपेची व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपीविरोधात पोक्सो कायदा तसेच भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. लैंगिक अत्याचारप्रकरणी न्यायालयाने दिलेला जन्मठेप व दंडाचा हा निकाल अल्पवयीनांच्या सुरक्षेचा ठाम संदेश देणारा ठरला आहे.

वयाने आजोबाच्या वयोगटातील असलेल्या व्यक्तीनेच तिच्या विश्वासाचा, तिच्या बालपणाचा आणि निष्पापतेचा गैरफायदा घेतला. ही अत्याचाराची घटना ७ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. पीडित मुलगी घरी एकटी असताना आरोपी वासुदेव गुरव याने घरामध्ये प्रवेश करत जबरदस्तीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. “कोणाला काही सांगितलेस तर तुला ठार मारीन,” अशी धमकी दिल्यामुळे पीडितेने घडलेली घटना कोणालाही सांगितली नाही. यानंतर १६ ऑक्टोबर रोजी आरोपीने पुन्हा पीडितेच्या घरी येऊन तिच्यावर अत्याचार केला. डिसेंबर महिन्यातही त्याने अश्लील बोलत ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्याचा प्रस्ताव दिला. काही दिवसांनी पीडित मुलगी गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. अखेर ३० जानेवारी २०२३ रोजी पीडितेने स्वतः पुढे येत तक्रार दाखल केली. राजापूर पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला होता. तसेच सत्र न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवले होते.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. अनुपमा ठाकूर यांनी प्रभावी आणि जोरदार युक्तिवाद करत आरोपीच्या गुन्ह्याचे गंभीर स्वरूप न्यायालयापुढे मांडले. त्यांच्या युक्तिवादामुळेच न्यायालयाने कठोर निर्णय घेतला आणि पीडितेला न्याय मिळवून दिला. हा निकाल म्हणजे ॲड. अनुपमा ठाकूर यांच्या कार्यक्षमतेचे आणि जबाबदारीच्या जाणिवेचे उदाहरण म्हणता येईल.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे यांनी केला. पोलिस कॉन्स्टेबल विकास खांदारे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. या खटल्यात एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीस भारतीय दंड संहितेचे कलम ३७६(३), ५०६ आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत दोषी ठरवत जन्मठेप व दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.

न्यायालयाने या प्रकरणातील गुन्ह्याची गंभीरता, पीडितेचे बालवय, आरोपीचे वय व नातेसंबंधाचा गैरफायदा या सगळ्या पैलूंवर लक्ष केंद्रित करत, आरोपीस जन्मठेप व दंडाच्या शिक्षेचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे समाजातील अशा प्रवृत्तीला रोख लागेल आणि पीडित व्यक्तींना पुढे येण्यासाठी आत्मविश्वास मिळेल, यात शंका नाही!

Tags: न्यायालयबाल अत्याचाररत्नागिरीशिक्षा
ShareSend
Previous Post

नाणार परिसरात प्रदूषणमुक्त प्रकल्पास केंद्र सरकारचा हिरवा कंदील!

Next Post

उद्योजक दीपक गद्रे यांना ‘रत्नागिरी उद्योग महर्षी’ प्रदान

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post
उद्योजक दीपक गद्रे यांना ‘रत्नागिरी उद्योग महर्षी’ प्रदान

उद्योजक दीपक गद्रे यांना 'रत्नागिरी उद्योग महर्षी' प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us