• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा हिंदुस्थान

पहलगाम हल्ल्यातील मुस्लिम दहशतवाद्यांचे छायाचित्र जारी

नराधम दहशतवादी आसिफ फुजी, सुलेमान शाह, अबू तल्हा यांची ओळख पटली

yogesh by yogesh
April 23, 2025
in माझा हिंदुस्थान
A A
0
पहलगाम हल्ल्यातील मुस्लिम दहशतवाद्यांचे छायाचित्र जारी

जम्मू : प्रतिनिधी

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी (२२ एप्रिल) दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून काश्मीरमधील परिस्थिती पूर्ववत झाल्याचा दावा सातत्याने केंद्र सरकार व स्थानिक प्रशासनाकडून केला जात होता. मात्र, हा दावा फोल ठरला आहे. दरम्यान, काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामागील संशयित दहशतवाद्यांचे छायाचित्र आणि रेखाचित्र सुरक्षा यंत्रणांनी जारी केले आहेत. फोटोत असलेल्या चौघांपैकी तीन दहशतवाद्यांची ओळख पटली असून आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी त्यांची नावे आहेत.

पहलगाम येथील बैसरन कुरणात पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. दहशतवादी गट लष्कर ए तैयबाची शाखा असलेल्या दि रेझिस्टन्स फ्रंटचे हे सदस्य असल्याचं म्हटलं जातंय. दरीच्या सभोवतालच्या घनदाट पाइन जंगलातून कुर्ता पायजमा घातलेले किमान ५ ते ६ दहशतवादी बैरसन कुरणात आले. त्यांनी एके ४७ ने गोळीबार केला. गुप्तचर संस्थांनी या हत्याकांडाचा सूत्रधार सैफुल्लाह कसुरी उर्फ खालिदचीही ओळख पटवली आहे. तो लष्कर-ए-तोयबाचा एक प्रमुख कमांडर होता. जंगलाचा फायदा घेऊन पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात दहशतवादविरोधी मोहीम सुरू केली आहे आणि हेलिकॉप्टर तैनात केले आहेत.

भारताची गुप्तचर यंत्रणा देखील अलर्टवर असून ते या दहशतवाद्यांची माहिती गोळा करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून नंबर प्लेट नसलेली एक संशयास्पद दुचाकी जप्त केली आहे. दहशतवादी याच दुचाकीवरून बैसरन येथे आले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दोन दहशतवाद्यांनी एम ४ कार्बाइन असॉल्ट रायफल बाळगल्या होत्या तर इतर दोघांनी एके-४७ रायफल बाळगल्या होत्या.

Tags: दहशतवादीपहलगामभारतसरकारहल्लाहिंदूस्थान
ShareSend
Previous Post

पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड : अभय कुरुंदकरला जन्मठेप

Next Post

सावधान ! फसवणूक करण्याचे ‘फ्रेश’ नाणे, प्राजक्ता-प्रविण रावसाहेब किणे! 

yogesh

yogesh

Related Posts

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 
माझा हिंदुस्थान

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 

July 23, 2025
तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!
माझा हिंदुस्थान

तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!

July 19, 2025
हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 
माझा हिंदुस्थान

हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 

May 24, 2025
जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी
माझा हिंदुस्थान

जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी

May 24, 2025
Next Post
सावधान ! फसवणूक करण्याचे ‘फ्रेश’ नाणे, प्राजक्ता-प्रविण रावसाहेब किणे! 

सावधान ! फसवणूक करण्याचे 'फ्रेश' नाणे, प्राजक्ता-प्रविण रावसाहेब किणे! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us