• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझं कोकण

मुंबई – गोवा महामार्ग जूनअखेर पूर्ण होणार : ना. गडकरी

yogesh by yogesh
April 16, 2025
in माझं कोकण
A A
0

मुंबई : प्रतिनिधी

‘मुंबई- गोवा महामार्गाच्या कामात भरपूर अडचणी आल्या, हा मार्ग आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉट होता. मात्र, आता यावर्षी जून अखेरपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण होईल’, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. दादरच्या अमर हिंद मंडळाच्या वतीनं आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत ‘महामार्ग विकासाचा’ या विषयावर ते बोलत होते.

दरवर्षी गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी त्यातही रस्ते मार्गानं कोकण गाठू पाहणाऱ्यांसाठी वाटेत अनेक अडचणी उभ्या असल्याचं पाहायला मिळतं. सर्वात मोठी अडचण असते ती म्हणजे वाहतूक कोंडीची. टप्प्याटप्प्यानं सुरू असणारी आणि रेंगाळलेली मुंबई- गोवा महामार्गाची कामं नेमकी कधी सुरू होणार, हाच प्रश्न अनेकदा अनेकांच्याच डोक्यात घर करत असतो. आता मात्र या प्रश्नाचं खात्रीशीर उत्तर खुद्द केंद्रीय मंत्र्यांनीच दिल्यामुळं कोकणकरांची आणि मुंबई- गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांची चिंता मिटली आहे, असं म्हणणं हरकत नाही.

देशाला विश्वगुरू करण्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढवावी लागेल. त्यासाठी लॉजिस्टिक कॉस्ट कमी करावी लागेल. चीनमध्ये लॉजिस्टिक कॉस्ट ८ टक्के आहे. युरोपातील देशांत ११ टक्के आहे. त्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट सध्याच्या दोन अंकी म्हणजेच जवळपास १६ टक्क्यांवरून ९ टक्क्यांवर येत्या जानेवारीपर्यंत आणली जाईल, असंही ते म्हणाले. गडकरी यांनी पुढील दोन वर्षात नॅशनल हायवेचं रस्ते जाळं अमेरिकेपेक्षा चांगलं होईल, असा आशावाद व्यक्त केला.

देशात विविध राज्यांमध्ये विविध महामार्ग, किंबहुना महाराष्ट्रातही मोठमोठे महामार्गांचे प्रकल्प हाती घेत पूर्णत्वास नेण्यात आले, तरीही एका मुंबई गोवा महामार्गाचं काम मात्र ताटकळतच राहिलं. अखेर या वाटेनं जाणाऱ्यांच्या प्रतीक्षेचा अंत झालेला असतानाच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमादरम्यान या महामार्गाचं काम नेमकं कधी पूर्ण होणार आहे, यासंदर्भातील माहिती देत नागरिकांना शब्दच दिल्याचं पाहायला मिळालं.

एनएचएआय’च्या टोलनाक्यांबाबत पुढील पंधरा दिवसांत नवे धोरण आणले जाणार आहे. त्यातून या टोलनाक्यांबाबत वाहनचालकांची कोणतीही तक्रार राहणार नाही, असं गडकरींनी सांगितलं. तसंच भविष्यात सॅटेलाइट बेस टोलवसुली केली जाणार असून त्यातून नागरिकांना टोलनाक्यांवर थांबावं लागणार नाही, असंही ते म्हणाले.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ अर्थात मुंबई- गोवा महामार्गाचं काम कधी पूर्ण होणार हाच प्रश्न सातत्यानं उपस्थित करण्यात येत होता. प्रत्यक्षात या महामार्ग बांधणीमध्ये अनेक अडचणींनी डोकं वर काढलं होतं. तीन एकर जमिनीची पंधराहून अधिक वारसदार असल्यामुळं त्यांच्यातच एकमत नसल्यानं जमिनीचा मोबदला कोणाला जाणार इथपासूनचे प्रश्न होते. आता मात्र या अडचणींवर तोडगा निघाला असून, रस्त्याचं काम अधिक झपाट्यानं पूर्णत्वाच्या दिशेनं जात आहे. ज्यामुळं यंदाचे गणपती या नव्या वाटेमुळं दणक्यात होणार असं म्हणणं गैर ठरणार नाही.

Tags: कोकणनितीन गडकरीमहामार्गमुंबई - गोवा महामार्ग
ShareSend
Previous Post

दोन वर्षात रत्नागिरी स्मार्ट शहर : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

Next Post

आ. किरण सामंत यांचा विषयच थेट… एकाच ठिकाणी मिळणार दाखले!

yogesh

yogesh

Related Posts

कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!
माझं कोकण

कोकण रेल्वेवर मध्य रेल्वेचा अन्याय!

April 3, 2026
नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदारांना मदत जाहीर करणार : मुख्यमंत्री
माझं कोकण

नुकसानग्रस्त आंबा – काजू बागायतदारांना मदत जाहीर करणार : मुख्यमंत्री

March 17, 2026
माझं कोकण

नागपूर – मिऱ्या महामार्गाचे काम ३ महिन्यात पूर्ण होणार : नितीन गडकरी

March 12, 2026
आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : नितेश राणे
माझं कोकण

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार : नितेश राणे

March 8, 2026
Next Post
माझा शब्द, हेच वचन! उक्तीचा राजापूरवासीयांना प्रत्यय

आ. किरण सामंत यांचा विषयच थेट... एकाच ठिकाणी मिळणार दाखले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us