देवरूख : प्रतिनिधी
समाजसेविका तथा पत्रकार सौ. भारती जयंत राजवाडे यांना पुणे येथील साऊज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व सर्च फाउंडेशनच्यावतीने राज्यस्तरीय आदर्श क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.दि ८ डिसेंबर २०२४ रोजी सावित्रीबाई फुले सांस्कृतिक सभागृह येथे हा पुरस्कार विविध मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
गेली १० वर्षे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या प्रामाणिक व निस्वार्थ हेतूने काम करणाऱ्या सातत्याने व सचोटीने सामाजिक बांधिलकीतून समाजकार्य करत असून शालेय गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती शिक्षणाच्या आड येऊन न देता त्यांना शिक्षणासाठी मोफत मार्गदर्शन व ११/१२ वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन कोचिंग क्लासेस उपक्रम राबवणे त्याचबरोबर वस्तीगृहातील मुलींसाठी सॅनिटरी पॅड मोफत वितरण करणे. शाळेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शाळेच्या विकासाच्या प्रगतीसाठी रोख रक्कम स्वरूपात मदत करणे निरक्षर व्यक्तींना साक्षर होण्यासाठी मदत करणे.पत्रकारितेच्या माध्यमातून तळागाळातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणे अशा विविध क्षेत्रातील कामाचा अनुभव पाठीशी असल्याने माझ्या कार्याची दखल घेत आदरणीय सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी ध्येय फाउंडेशन तर्फे पुरस्काराने गौरवण्यात आले. पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.