रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी येथे आज पत्रकार परिषद आयोजित करत प्रथमेश गावणकर यांनी मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. रत्नागिरी तालुक्यात प्रथमेश गावणकर यांचं कार्य चांगल असल्याने येणाऱ्या विधानसभेत शिवसेनेला याचा मोठा फायदा होणार आहे.
प्रथमेश गावणकर यांनी गेल्या तीन वर्षांपासून रत्नागिरीत सामाजिक कार्य करत जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या निस्वार्थी कार्यामुळे ते जनतेमध्ये लोकप्रिय झाले आहेत. आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेला नवीन ऊर्जा दिली आहे.
यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, “प्रथमेश गावणकर यांची कारकीर्द उंचावण्याची जबाबदारी आम्ही उचलली आहे. त्यांनी सर्व विचार करून हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे रत्नागिरीत शिवसेनेचे मताधिक्य वाढेल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रथमेश गावणकर म्हणाले की, “शाश्वत निर्णय घेत आज शिवसेनेत प्रवेश करतोय. आज पासून राजकीय वाटचाल सुरू करत करत आहे. सामाजिक पातळीवरील कार्याला चालू ठेवत आता राजकारणातही जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी उदय सामंत यांचे आभार मानत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी दर्शवली”. यावेळी शिवसेनेचे अनेक मोठ्यासंख्येने पत्रकार बंधू, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.