राजापूर : प्रतिनिधी
राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे लोकप्रिय उमेदवार महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांना राजापूर तालुक्यातील डोंगर मोहल्ल्यातील मुस्लिम समाजाने एकत्रित येत त्यांचे नेतृत्व स्वीकारून पाठिंबा जाहीर केला आहे.
राजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये किरण सामंत यांनी प्रचारात मुसंडी मारली असून अनेक स्तरातून त्यांना पाठिंबा दर्शवला जात आहे. त्यामध्ये मुस्लिम समाज कुठे मागे राहू नये यासाठी डोंगर गावातील मुस्लिम समाजाने एकत्रित येत किरण सामंत यांचे गावांमध्ये स्वागत करून त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. होणाऱ्या निवडणुकीमध्ये पूर्ण डोंगरगाव तुमच्या पाठीशी असल्याचे सांगत मुस्लिम समाजही त्या मताधिक्यामध्ये इथला वाटा अधिक असेल असा शब्द येथील मुस्लिम समाजाने किरण सामंत यांना दिला आहे.
यावेळी इमरान डोंगरकर,नौशाद काझी, यासीन तांडेल मुंबई कमिटीचे अध्यक्ष त्याचप्रमाणे गावातील प्रमुख मान्यवर, मुस्लिम समाजातील पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, उपजिल्हाप्रमुख अशपाक हाजू यांच्यासहित पदाधिकारी उपस्थित होते.




