• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

कोकण सुपुत्र जे. डी. पराडकर यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

एका वर्षात सलग १ हजार १९२ पाने लिहिण्याचा विक्रम, कोकण विषयावर सलग आठ पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम

yogesh by yogesh
September 28, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0
कोकण सुपुत्र जे. डी. पराडकर यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

संगमेश्वर : प्रतिनिधी

एक लेखक , एक विषय आणि एकच प्रकाशक मिळून सलग आठ पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या पुणे येथील चपराक प्रकाशन आणि संपादक घनश्याम पाटील यांनी प्रकाशित केलेल्या कोकणच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील लेखक जे. डी. पराडकर यांच्या लेखन विक्रमाची ‘ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ’ मध्ये नोंद झाली आहे.

जे. डी. पराडकर हे गेली ३२ वर्षे विविध विषयांवर लेखन करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोकणचे पर्यावरण, पर्यटन, गड किल्ले , ऐतिहासिक स्थळे, पुरातन मंदिरे, व्यक्तिमत्वे यांचा समावेश आहे. आजवर त्यांचे एक हजार पेक्षा अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. कोकणवर सातत्याने लेखन करणाऱ्या पराडकर यांच्या लेखनाची दखल प्रथम ‘ कालनिर्णय ’ चे संचालक जयेंद्र साळगांवकर यांनी घेतली. पुस्तक रूपाने हे लेखन सर्व वाचकांसमोर यावे, या उद्देशाने साळगांवकर यांनी पुणे येथील चपराक प्रकाशनचे संपादक त्यांचे मित्र घनश्याम पाटील यांच्याकडे पराडकर यांच्या लेखनाची शिफारस केली. जे. डी. पराडकर यांनी चपराक प्रकाशन मध्ये जावून संपादक घनश्याम पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी पाटील यांनी , कोकण वरील आपले सर्व लेखन आवडल्याचे नमूद केले. आपले एकच काय, तर कोकण वरील अनेक पुस्तके प्रकाशित करण्याचे आश्वासन घनश्याम पाटील यांनी या भेटी प्रसंगी दिले होते .

चपराक प्रकाशनने अल्पावधीतच जे. डी. पराडकर लिखित कोकण वरील ‘ साद निसर्गाची ’ हे पहिले पुस्तक प्रकाशित केले. त्यानंतर कसबा डायरी, असं जगावं कधीतरी, बारा सोनेरी पाने आणि डोंगरावरच्या कथा, अक्षर यात्रा , प्राजक्ताचे सडे , हळवा कोपरा आणि वेध अंतर्मनाचा अशी एकापाठोपाठ एक पुस्तके प्रकाशित करून पराडकर यांची कोकण या एकाच विषयावरील एकूण आठ पुस्तके प्रकाशित केली. 

एका वर्षात सलग ०१ हजार १९२ पाने लिहिण्याचा विक्रम लेखक जे. डी. पराडकर यांनी केला. एकाच लेखकाची, कोकण या एकाच विषयावर सलग आठ पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम चपराक प्रकाशन पुणे , संपादक घनश्याम पाटील यांनी केला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने सर्व पुस्तकांचे आयएसबीएन नंबर तपासले, पुस्तकांच्या हार्ड कॉपी आपल्याकडे मागवून घेतल्या. विक्रीसाठी ऑनलाइन उपलब्ध असणाऱ्या पुस्तकांच्या लिंक तपासल्या , पुस्तकांची मुखपृष्ठ पहिली , पुस्तकांच्या पीडीएफ फाईल तसेच प्रथम श्रेणी दर्जाच्या अधिकाऱ्याचे सर्व लेखन जे. डी. पराडकर यांनीच केले असल्याचे शिफारस पत्र , आदींची गत दोन महिने विविध प्रकारे तपासणी केली. या सर्व प्रकारच्या तपासणीनंतर चपराक प्रकाशन आणि लेखक जे. डी. पराडकर यांच्या या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये नोंद केली. याबाबतचे प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, ओळखपत्र, मेडल आदि जे. डी. पराडकर यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. या विक्रमाबद्दल चपराक प्रकाशन, संपादक घनश्याम पाटील, लेखक जे. डी. पराडकर यांचे विविध मान्यवर लेखक, सामाजिक संस्था, मान्यवर मंडळी आदींनी अभिनंदन केले आहे.

Tags: इंडिया बुककोकणजे. डी. पराडकर
ShareSend
Previous Post

वक्फ बोर्डाची याचिका फेटाळली

Next Post

महाराष्ट्रात २६ नोव्हेंबरपूर्वी निवडणूक होणार

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post

महाराष्ट्रात २६ नोव्हेंबरपूर्वी निवडणूक होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us