• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

शासकीय तंत्रनिकेतनमधील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी बाळ माने यांची मंत्रालयातील चर्चेनंतर तोडगा

yogesh by yogesh
September 24, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0
शासकीय तंत्रनिकेतनमधील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा

रत्नागिरी : प्रतिनिधी

रत्नागिरीसह राज्यातील शासकीय तंत्रनिकेतनमधील शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. या समस्येवर दोन तीन तोडगे काढण्यात आले असून लवकरच शिक्षक उपलब्ध होतील व विद्यार्थ्यांचे शिक्षण चांगल्या रितीने सुरू राहील, याबाबत आज सायंकाळी रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, तंत्रशिक्षण संचालक श्री. मोहितकर व अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकरच सुटेल असे बाळ माने यांनी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले.

दोन दिवसांपूर्वी बाळ माने यांनी रत्नागिरीतील शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची समस्या जाणून घेतली. काही शिक्षकांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे भरतीला स्थगिती मिळाली आहे. ही बाब न्यायप्रविष्ठ आहे. राज्याचे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व स्थगिती उठवण्यासंदर्भात पहिला पर्याय म्हणून विद्यार्थ्यांच्या वतीने पालक म्हणून खंडपीठाकडे याचिका मांडण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. अॅडव्होकेट जनरल यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य मांडणी करून कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन चंद्रकांतदादांनी दिल्याचे बाळ माने यांनी सांगितले.

एमपीएससीच्या माध्यमातून पद भरती केली जाणार आहे. ही प्रक्रिया जलद गतीने करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तसेच यापूर्वी तंत्रनिकेतनमध्ये १५ विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापक असत. आता हा नियम २५ विद्यार्थ्यांमागे एक प्राध्यापक असे झाला आहे. त्यामुळे मोठ्या शहरांतील पॉलिटेक्निकमध्ये अतिरिक्त ठरणाऱ्या प्राध्यापकांना जवळच्या जिल्ह्यात विनंती करून पाठवण्यात येणार आहे. हा चांगला निर्णय असून यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील. यासंदर्भातील प्रक्रिया करण्याचे आश्वासनही चंद्रकांत दादांनी दिले आहे. आजच्या चर्चेप्रसंगी दादांचे स्वीय सहायक अतुल खानोलकर यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता प्रयत्न करूया, असे सांगितले, असे बाळ माने यांनी बोलताना सांगितले. आजच्या बैठकीला युवा नेते मिहीर माने, तंत्रशिक्षण संचालक तसेच अधिकारी उपस्थित होते.

Tags: बाळ मानेबाळासाहेब मानेभाजपभाजपा
ShareSend
Previous Post

एसटीच्या जागा विकासासाठी ६० वर्षांपर्यंत भाडेकरार

Next Post

राष्ट्रीय ‘पोषण माह’ राबविण्यात देशात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post
राष्ट्रीय ‘पोषण माह’ राबविण्यात देशात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

राष्ट्रीय ‘पोषण माह’ राबविण्यात देशात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us