हिंदू मुलाचे इंस्टाग्रामवर फेक अकाउंट काढून पंजाब येथील हिंदू मुलीला मुस्लिम अल्पवयीन मुलाने आपल्या जाळ्यात ओढण्याची घटना घडली आहे. रत्नागिरी येथील हर्ष यादव नावाच्या तथाकथित हिंदू मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. यामागे अल्पवयीन मुस्लिम मुलांच्या टोळक्याने पीडित मुलीला फसवल्याचे पुढे आले आहे. यामागे नेमका सूत्रधार कोण याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे. तेरा वर्षीय मुस्लिम मुलगा इंस्टाग्राम अकाउंट काढतो आणि हिंदू मुलीला फुस लावून पंजाब राज्यातील मोहाली इथून लग्नाच्या आमिषाने बोलावतो. ती मुलगी हिंदू असल्याने त्या हर्ष यादव नावाच्या तथाकथित हिंदू मुलाच्या प्रेमात पडते आणि आपल्या आई-वडिलांचे घरदार सोडून रत्नागिरीमध्ये येते. रत्नागिरीमध्ये रेल्वे स्टेशन परिसरात आल्यावर तिला खरी परिस्थिती कळते. प्रत्यक्षात हर्ष यादव नावाचा मुलगा ज्या मोबाईलवरून फोन आणि मेसेज होत असतो तो अस्तित्वातच नसतो, तर तो मोबाईल एका मुस्लिम मुलाचा असतो. त्या मुस्लिम मुलाचा आणि हर्ष यादवचा आवाज मात्र सारखा असतो. रत्नागिरीत आल्यावरती ती मुलगी हर्ष यादवच्या फोन वरती कॉल करते, त्यावर समोरून जो प्रतिसाद मिळतो तो मुस्लिम मुलाच्या घरातील असतो. तिला आपली फसवणूक झाल्याचे कळते. रेल्वे स्टेशन परिसरात पंजाबहुन इतक्या दूर ती एकटी पडते. ती सैरभैर होते…
खिशात एकही रुपया नसतो. मोबाईलचे सिम तोडून फेकून दिलेले असते. वडिलांचा फोन नंबर सोडून अन्य ज्या मुलाने हिंदू मुलाचे फेक अकाउंट इंस्टाग्रामवर काढून तिला नंबर दिला होता, त्या मुस्लिम मुलाचा फोन नंबर तिच्याकडे असतो. तो नंबर तिच्याकडे हिंदू मुलगा असल्याने आणि त्याच्या प्रेमात पडल्याने असतो. मात्र प्रत्यक्षात रत्नागिरीत आल्यावर ती त्या नंबर वर कॉल करते. आणि समोरून हिंदू मुलाचा आवाज ऐकू न येता एका मुस्लिम महिलेचा आवाज ऐकू येतो. ती मुस्लिम महिला सांगते की हा नंबर तुला जो हवा त्या मुलाचा नाही. पुन्हा कॉल करू नकोस. ती महिला मुस्लिम असल्याचे कॉल वरून समजते आणि पंजाबहून आलेल्या हिंदू मुलीला आपण फसवले गेल्याचे लक्षात येते. पण करणार काय? खिशात दमडीही नसल्यामुळे मागे जाणार कसे? म्हणून ती रेल्वे स्टेशन परिसरा नजीक असलेल्या एका मोबाईल शॉपी मध्ये काम मागायला जाते. चार दिवस काम करू जितके पैसे मिळतील ते घेऊ आणि आपल्या घरी परत जाऊ, या विचाराने ती जॉब शोधण्यास सुरुवात करते आणि एका मोबाईल शॉपीमध्ये येते. मोबाईल शॉपी मालक त्या मुलीला कुठून आली? इथे कशी आली? आणि त्या मुलीच्या वडिलांचा फोन नंबर घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला. वडिलांना ती सुखरूप असल्याचे कळवले आणि तात्काळ त्या मुलीला रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथील पोलीस चौकीत पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना अगदी वास्तव असून त्यानंतर पोलिसांनी पीडित हिंदू मुलीने दिलेल्या फिर्यादीनंतर एका तथाकथित हिंदू मुलावरती गुन्हा दाखल केला. आणि अन्य एका अल्पवयीन मुस्लिम मुलाची चौकशी केली. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलाने गुन्हा कबूल केल्याचे ही पुढे आले आहे. प्रश्न हा उरतो त्या अल्पवयीन मुलाचे वय तेरा वर्षे आहे. साधारण एक वर्ष तो तिच्याशी चॅटिंग करतोय. बाराव्या वर्षापासून जर तो चॅटिंग करतो तर इतक्या लहान वयात या मुलावर असले संस्कार करणारे तरी नेमके कोण? याचा शोध घेणे पोलिसांना गरजेचे आहे. आता पोलीस कोणत्या दिशेने तपास करतात हे येणाऱ्या काळात ठरेल. मात्र त्यानिमित्ताने लव्ह जिहाद म्हणजे नेमकं काय याचे उदाहरण रत्नागिरीकरांसमोर उघड झाले आहे.
हिंदू मुलींनो, सावधान!
आत्तापर्यंत अशा अनेक लव्ह जिहादच्या घटना घडलेल्या असतील. त्याबद्दल कोणीही अवाक्षरही काढलेले नसेल. कुणाला याची तसूभरही कल्पना नसेल. आपल्या दाराशी येत नाही तोपर्यंत आपण निवांत! पण पंजाबमधून एका हिंदू मुलीला लग्नाचे आमिष दाखवून, आणि त्यासाठी खोटे अकाउंट काढून त्यावरून आपण हिंदू असल्याचे खोटे सांगून रत्नागिरीत येण्यासाठी प्रवृत्त करणे ही गोष्ट वाटते तितकी सहज सोपी नाही. यामागे असणारे सूत्रधार पोलीस कधी पकडणार यावर सर्व अवलंबून आहे. आपल्या घरात आपली मुलगी काय करते? कोणाशी बोलते? बोलणारी व्यक्ती कोण आहे? तिचे मित्र कोण आहेत? तिच्या मैत्रिणी कोण आहेत? त्याची खातरजमा प्रत्येकानेच करायला हवी. त्याचा अर्थ मुलींना दबावात ठेवणे असा नाही. तर मुलींवर चांगल्या संगतीचे चांगले परिणाम होतील आणि वाईट संगतीचे वाईट परिणाम होतील हे बिंबवणे गरजेचे आहे. मित्रपरिवार करताना ते आपले मित्र म्हणून कितपत खरे आहेत याची जाणीव पालकांनीच करून द्यायला हवी. जेव्हा पालक कमी पडतात तेव्हा अशा घटना होत राहतात. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही, हिंदू मुलींनो, सावधान!
मोहालीतून हिंदू मुलगी रत्नागिरीत आली ती हर्ष यादव या नावासाठी…या नावाच्या मुलाच्या प्रेमाखातर घरदार सोडून लग्न करण्यासाठी…आपला संसार फुलवण्यासाठी…मात्र रत्नागिरीत आल्यावरती तिला हर्ष यादव नावाचं काल्पनिक पात्र असल्याचे समजते आणि आपली फसवणूक झाल्याचे कळते. तेव्हा तिला धक्का बसतो. रत्नागिरीमध्ये देशाच्या एका कोपऱ्यातून आलेली ही मुलगी एकटी असते. मात्र हिंदू बांधव एकवटतात तिला साथ देतात. आधार देतात आणि तिच्या वडिलांपर्यंत जाण्यासाठी तिला मदत करतात. ही मदत त्या मुलीला झाली. त्या मुलीच्या आई-वडिलांची पुण्याई थोर म्हणून ती मुलगी पुन्हा आई-वडिलांना मिळाली. मात्र प्रत्येक ठिकाणी असे घडेलेच असे नाही. कोणी मदतीला येईल असे होईलच असे नाही. त्यामुळे प्रत्येक हिंदू मुलीने आपण आपली काळजी घ्यायला हवी. आपले पालक आपल्याला लहानाचे मोठे करतात. आपल्याला सक्षम बनण्यासाठी शिक्षण देतात. नोकरी धंदा याच्यासाठी धडपड करतात. त्यासाठी पालकांनी खस्ता खाल्लेले असतात. कुणाच्यातरी गोड बोलण्याला भुलून आपण आपलं घरदार आपले आई-वडील यांना दूर करतो आणि दुःखाच्या खाईत जातो. कधीतरी त्या खाईतून बाहेर काढायला कोणीतरी मसीहा येतो. मात्र प्रत्येक वेळी हा मसीहा येईलच असे नाही. त्यामुळे स्वतःची खबरदारी स्वतःच घ्यायला हवी. खास करून हिंदू मुलींनो मित्र करताना मैत्रिणी करताना त्यांची पारख करायला शिका अन्यथा कधीतरी जगाच्या बाजारात एकट्या पडाल आणि अख्खा समाज तुमचा आनंद घेत राहील!
अल्पवयीन मुलामागे नेमका सूत्रधार कोण?
तेरा वर्षाच्या मुस्लिम मुलाने एका १७ वर्षाच्या हिंदू मुलीला इंस्टाग्रामवर हिंदू मुलाचे फेक अकाउंट काढून रिक्वेस्ट पाठवायची. तिच्याशी हिंदू म्हणूनच बोलायचे. आपण एका राजकारणी कम बिजनेसमन आईबापाचे कार्टे असून आपली डिझेल कंपनी असल्याचे भासवायचे. आपण कॉलेज करत असून वडिलांच्या कंपनीमध्ये कॉलेज आटोपल्यानंतर काम करतो त्यांना हातभार लावतो हे सांगायचे आणि आपण कसे व्यावसायिक आणि स्टेबल आहोत त्याचे मुलीच्या डोक्यात विचार घालायचे. हे सगळे तेरा वर्षाच्या मुलाला कसे काय सुचते? मुलगी पंजाब मधून निघते त्यावेळी तिला तिकीट काढण्यासाठी लागणारे पैसे हे तिथल्या दुसऱ्या व्यक्तीच्या क्यूआरकोडवर पाठवून मुलीला कॅश देण्यास सांगणे, तिथून पुढे आल्यावर ती मोबाईलचे सिम कार्ड तोडून फेकून देण्यास सांगणे, फोन करायचा असल्यास दुसऱ्याच्या फोनवरून फोन करण्यास सांगणे हे ह्या अल्पवयीन मुलाला त्याच्या अल्पबुद्धीला कसे काय सुचू शकते? खरंतर हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हे असे प्रश्न पडल्यावर ती यामागे दुसरा सूत्रधार तर कोणी नाही? ही शंका प्रत्येकाच्या मनात चुकचुकल्याशिवाय राहणार नाही. अर्थात पोलीस तपास करायला सक्षम आहेत त्यामुळे याचा पर्दाफाश ते नक्की करतील!
पीडित हिंदू मुलीची ट्रेन लवकर आली म्हणून….
पीडित हिंदू मुलगी ट्रेनने येईल आणि ती आल्यावरती तिच्यासाठी गाडी पाठवू ज्या गाडीत त्या मुलाचे आणि त्या मुलीचे नाव असेल त्या गाडीत बसायचे असे लेडीज हिंदू मुलीला कॉल वरून सांगण्यात आले. या नंबर वरून सांगण्यात आले तो नंबर रुजान तवसाळकर या नावाने आहे. प्रत्यक्षात रेल्वे वेळेआधीच आली आणि त्या गाडीची आणि मुलीची चुकामुक झाली. दैव बलवत्तर म्हणून ही चुकामुक झाली आणि त्या मुलीला जॉब शोधण्याची बुद्धी सुचली. त्यामुळेच ती पोलिसांच्या स्वाधीन झाली आणि त्यानंतर घडलेल्या घडामोडीनंतर ती तिच्या पालकांकडे सुखरूप पंजाबला गेली. त्या मुलीला शिकून जज व्हायचे आहे आणि आई-वडिलांच्या सोबत आनंदात राहायचे आहे. रत्नागिरीतील हिंदू मुलांच्या एकीमुळे एका बहिणीला तिचे आई-वडील मिळाले.
एक कॉल आणि हिंदू एकतेचा संदेश
पंजाबहून एक हिंदू मुलगी रत्नागिरीत आली आहे आणि तिची सोशल मीडियावर फसवणूक झाली आहे. ती एकटी असून तिला मदतीची गरज आहे. रत्नागिरीतील हिंदू बांधवांना समजले आणि हिंदू एकीचा प्रत्यय आला. समस्त हिंदू बांधव एकत्र येऊन तिच्या रक्षणासाठी आणि तिला लागणाऱ्या मदतीसाठी अगदी तिच्या राहण्या खाण्यापासून सगळी तजवीज करण्यापर्यंत धावत होते. जणू ती आपल्या घरातील एक बहीण असून सुखरूप असावी असा प्रत्येकाचा प्रयत्न होता. त्यासाठी हिंदू एकी पाहायला मिळाली.