• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा महाराष्ट्र

रुग्णांसाठी १०८ रुग्णवाहिका ठरतेय संजीवनी!

yogesh by yogesh
July 6, 2024
in माझा महाराष्ट्र
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी
आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत ‘डायल १०८’ ही रूग्णवाहिका सेवा रूग्णांना संजीवनी ठरली आहे. या सेवेने राज्यातील नागरिकांची आरोग्य सेवा करीत तब्बल १० वर्ष पूर्ण केले आहे. या दहा वर्षाच्या कालावधीत १०८ रूग्णवाहिका सेवेने राज्यात १ कोटी ३ हजार ४४६ रूग्णांची विनामूल्य आरोग्य सेवा केली आहे. अर्थात ही योजना रूग्णांना जीवनदायी ठरत आहे.

राज्यात कोणत्याही ठिकाणावरून मोबाईल अथवा दूरध्वनीवरून १०८ क्रमांक डायल करताच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रूग्णांना विनामूल्य आणि वेळेत रूग्णवाहिका सेवा देण्यात येते. कुणी आजारी असेल, अपघात झाला असेल किंवा वैद्यकीय सेवेची मदत असेल तर १०८ रूग्णवाहिका सेवेसाठी तत्पर असते. आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी ‘एक-शून्य-आठ’ हा विनामूल्य दूरध्वनी क्रमांक आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग व भारत विकास ग्रुपच्या (बीव्हीजी इंडिया) संयुक्त विद्यमाने ही सेवा अव्याहतपणे राज्यात ठिकठिकाणी चालविण्यात येत आहे.

महाराष्ट्रात या सेवेची सुरूवात जानेवारी २०१४ मध्ये झाली. राज्यात सध्या ९३७ रूग्णवाहिका असून सर्व रूग्णवाहिकेत पल्स ऑक्स‍िमीटर, मेडीकल ऑक्सिजन यंत्रणा सज्ज आहे. ही देशातील अविरत २४ तास डॉक्टर व अत्यावश्यक वैद्यकीय सुविधेसह असणारी एकमेव यंत्रणा आहे. राज्यात १०८ रूग्णवाहिकेमध्ये ४० हजार २१३ प्रसुती करण्यात येऊन त्यांना सुखरूप सोडण्यात आले आहे. तसेच ४ हजार ३४ रूग्णांना कृत्रिम श्वासोच्छवास (व्हेंटीलेटर) ची सुविधा देण्यात येऊन त्यांचे प्राण वाचविण्यात आले आहे. सेवा सुरू झाली तेव्हापासून, जून २०२४ पर्यंत अपघाती घटनांमध्ये रूग्णवाहिकेमधून ५ लाख २२ हजार ६८२ रूग्णांना उपचारासाठी रूग्णालयात पोहचविण्यात आले आहे. तसेच आगीच्या घटनांमध्ये २९ हजार २५३, हृदयरोगमध्ये ७५ हजार ५९३, उंचावरून पडून जखमी झालेल्या १ लाख ५८ हजार ६८४, विषबाधा प्रकरणी २ लाख ३२हजार ४२६, प्रसुतीवेळी १६ लाख ५६ हजार ९४, शॉक किंवा वीज पडून जखमी या घटनांमध्ये ६ हजार ९४९ रूग्णांना सेवा देण्यात आली आहे. अशा प्रकारे राज्यात १ कोटी ३ हजार ४४६ रूग्णांना आरोग्य सेवा १०८च्या माध्यमातून मिळाली आहे.

राज्यात नाशिक येथील महाकुंभमेळा कालावधीत १ लाख ७ हजार २००रूग्णांना सेवा दिली. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या पंढरपूरच्या वारीमध्ये २ लाख ८९हजार ६४६ आणि गणपती उत्सवात ४ हजार ६८४ रूग्णांना १०८ ने सेवा दिली आहे. या सेवेमध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा सेवेच्या समाधानाबाबत नागरिकांचा प्रतिसाद (फिडबॅक) देखील घेण्यात येतो. राज्यात सेवेबद्दल ६ लाख ७४ हजार ५४२ प्रतिसाद प्राप्त झाले आहे. यामध्ये ८१ हजार १५५ एकदम उत्तम, ५ लाख ७० हजार ५९४ उत्तम आणि २२ हजार ७९३ चांगला प्रकारातील आहे. त्यामुळे राज्यात १०८ रूग्ण्वाहिका सेवा ही रुग्णांना संजीवनी आहे.

Tags: १०८आरोग्यरुग्णवाहिका
ShareSend
Previous Post

‘डी-मार्ट’च्या अनोंदणीकृत कामगारांना विविध लाभ मिळणार

Next Post

रत्नागिरीत महायुती बासनात, ‘लाडकी बहीण’ केवळ शिवसेनेची!

yogesh

yogesh

Related Posts

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश
माझा महाराष्ट्र

धार्मिक स्थळांवरील विनापरवानगी भोंगे ७ दिवसांत हटवा; नागपूर खंडपीठाचा आदेश

March 7, 2026
ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती
माझा महाराष्ट्र

ईठ्ठला नाटकावर बंदी घाला, अन्यथा राज्यभर आंदोलन : हिंदु जनजागृती समिती

March 2, 2026
मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर
माझा महाराष्ट्र

मंत्रालयातील लाचखोरीचा पर्दाफाश : फाईलवरील रंगांच्या रेषा ठरवत होत्या लाचेचा दर

February 20, 2026
तीन भाषांची सक्ती करून बालपण हिरावून घेऊ नका!
माझा महाराष्ट्र

मुस्लिम समाजाचे ५ टक्के आरक्षण रद्द; राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 18, 2026
Next Post

रत्नागिरीत महायुती बासनात, 'लाडकी बहीण' केवळ शिवसेनेची!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us