• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, April 14, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

राजरत्न प्रतिष्ठानची माणुसकी!

yogesh by yogesh
July 3, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0

राजापूर शहरात फिरणारे ३ मनोरूग्ण मनोरूग्णालयात उपचारांसाठी दाखल

राजापूर : प्रतिनिधी
राजापूर शहरात फिरणाऱ्या ३ अनोळखी मनोरूग्णांना रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानने उपचारासाठी रत्नागिरी शासकीय मनोरूग्णालयात दाखल करून पुन्हा एकदा माणसुकीचे दर्शन घडविले आहे. यासाठी राजापूर न. प. व पोलीस प्रशासनाचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. या तिन्ही मनोरूग्णांना राजरत्न प्रतिष्ठानच्या सहकार्याने ताब्यात घेत त्यांची शारिरीक स्वच्छता करून व जिल्हा शासकिय रूग्णालयात वैद्यकिय तपासणी करून त्यांना मानसिक उपचारांची आवश्यकता असल्याने त्या उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा मनोरूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राजरत्न प्रतिष्ठानने आत्तापर्यंत १९२ मनोरूग्णांची सेवा करत त्यांना मनोरुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. त्यातील ९० मनोरुग्ण बरे होऊन आपापल्या घरी सुखरूप पोहचले आहेत. बाकी रुग्णांवर उपचार सुरू ठेवले आहेत. याकामी जिल्हा शासकीय रुग्णालय, शासकीय मनोरुग्णालय यांचे सहकार्य लाभते. रुग्ण बरा होऊन आपल्या घरी जातो आपल्या नातेवाईकांमध्ये जातो, तेव्हा केलेल्या कामाचे चीज होते, अशी प्रतिक्रिया प्रतिष्ठानचे अध्यक्ष रुपेश सावंत यांनी दिली. या कामात राजरत्न प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांची कायम साथ मिळत असते, असेही सावंत यांनी सांगितले.

राजापूर शहरात गेले काही दिवस ३ अनोळखी मनोरूग्ण फिरत होते.  शहर बाजारपेठ परिसरासह सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या या मनोरूग्णांच्या उपद्रवामुळे शहरातील व्यापारी, नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे या मनोरूग्णांबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत होती.याबाबत ॲड. खलिफे यांनी तातडीने दखल घेतली व रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानशी संपर्क साधला. यासाठी राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले, राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी देखील मोलाचे असे सहकार्य केले.

रत्नागिरीतील राजरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष रूपेश सावंत, संतोष सावंत, छोटू खामकर व सहकाऱ्यांनी राजापूरात येत या तिन्ही मनोरूग्णांना पोलीस व नगर परिषदेच्या सहकार्याने ताब्यात घेत, त्यांची शारिरीक स्वच्छता करून त्यांना नवीन कपडे घालुन त्यांना जिल्हा शासकिय रूग्णालयात वैदयकिय तपासणीसाठी नेले. तेथे त्यांची वैद्यकिय तपासणी करून त्यांच्यावर मनोरूग्णालयात उपचार होऊन ते चांगले बरे व्हावेत यासाठी त्यांना जिल्हा मनोरूग्णालयात दाखल केले आहे.माजी नगराध्यक्ष ॲड. खलिफे यांसह राजरत्न प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, पोलीस व नगर परिषद प्रशासनाने या मनोरूग्णांना उपचारासाठी दाखल करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे. ॲड. खलिफे यांनी यापुर्वीही राजरत्न प्रतिष्ठानच्या माध्यमातुन अशा प्रकारे शहरात फिरणाऱ्या शहरातील तसेच अनोळखी अनेक मनोरूग्णांना अशा प्रकारे उपचारांसाठी दाखल केलेले आहे. ॲड. खलिफे यांनी राजरत्न प्रतिष्ठानच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदविताना या प्रतिष्ठानचे अधिकृत सदस्यत्वही स्विकारले आहे. त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: मनोरुग्णरत्नागिरीराजरत्न प्रतिष्ठानसेवा
ShareSend
Previous Post

हिंदूंना हिंसक ठरवणाऱ्या राहुल गांधीचा निषेध : हिंदू जनजागृती समिती

Next Post

आता मोबाईलवरूनही करता येणार ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज!

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत इफेक्ट : लांजातील उड्डाण पुलाला अंडरपास ठेवणार

April 12, 2026
आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या पाठपुराव्याने राजापूर दिवाणी न्यायालय इमारतीसाठी ७७.६३ लाख मंजूर

March 12, 2026
आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नाने राजापुरात ‘रक्त साठवण केंद्र’

March 6, 2026
ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!
माझी रत्नागिरी

ईठ्ठला नाटकावर तात्काळ बंदी घाला!

March 2, 2026
Next Post

आता मोबाईलवरूनही करता येणार 'लाडकी बहीण' योजनेसाठी अर्ज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us