राजापूर : प्रतिनिधी
दुचाकीची चोरून अणुस्कुरामार्गे कोल्हापूरच्या दिशेने पळणाऱ्या तिघांचा पोलीसांनी पाठलाग केला. दोन्ही बाईक टाकून दोघे पसार झाले. ग्रामस्थांच्या मदतीने एकाला ताब्यात घेतले असून तो अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे. दोन्ही बाईक पोलीसांनी ताब्यात घेतल्या असून त्यापैकी एक बाईक संगमेश्वर येथील चो्रीला गेल्याचे निष्पन्न झाले आहे. रविवारी दिवसभर सुमारे तीस पोलीसांची कूमक येरडव, अणुस्कुरा परीसरात पसार दोघांचा शोध घेत होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन बाईकवरून तीन अनोळखी तरुण ओणीमध्ये आले होते. तेथे त्यांनी पिस्तूलसारख्या दिसणाऱ्या लाईटरने एकादोघांना धमकवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर घडलेल्या प्रकाराची माहिती राजापूर पोलीसांना देण्यात आली होती. ओणीवरून अणुस्कुरा घाटाच्या दिशेने दोन बाईक वरून ते तिघेजण निघाले होते. मात्र अणुस्कुरा येथील चेकपोस्ट येथे वर्दिवर असलेले पोलीस पाहून ते हबकले. त्यांनी येरडवच्या दिशेने पलायन केले. वाटेतच दोन्ही बाईक टाकुन ते आजूबाजूला असलेल्या जंगलात जाऊन लपले. दरम्यान मोठा पोलीस फौंजफाटा घाट परीसरांत वाढविण्यात आला. स्वतः पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी घटनास्थळी दाखल झाले होते. स्थानिक ग्रामस्थ सुद्धा मदतीसाठी धावून आले. सर्वांनी येरडव परीसरासह घाटाचा परीसर पिंजून काढायला सुरुवात केली. पळालेल्या त्या तिघांचा शोध सुरु होता. दरम्यान पोलीसांच्या तावडीत एकजण सापडला. पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले असून तो अल्पवयीन असल्याची माहिती पोलीसांनी दिली.अन्य दोघे पसार होते. रात्रभर पोलीसांची चार पथके कसून शोध घेत होते. बाईक वरून आलेले तिघेही जण पारनेर जिल्हा अहमदनगर मधील असल्याचे तपासात पुढे आले आहे.
चौकशी दरम्यान पसार असलेल्या अन्य दोघांमध्ये दीपक श्रीमंदीलकर, अजय घेगडे अशी त्यांची नावे असल्याचे समजले. त्यांनी होंडा युनिकॉन, व केटीएम डुक या दोन बाईक चोरून पुण्याच्या दिशेने ते चालले होतें. दोन्ही गाड्यांवर नंबर प्लेट नव्हती मिळालेल्या माहितीनुसार दोन, तीन दिवसांपूर्वी संगमेश्वर तालुक्यातुन एक बाईक चो्रीला गेली होती ती गाडी त्या तिघांकडे आढळून आली. संगमेश्वर तालुक्यातील सुनील भार्गव सुर्वे यांची गाडी कुरघुंडा येथून १६ मेला चो्रीला गेली होती. पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या दोन गाड्या मध्ये चो्रीला गेलेली ती गाडी आढळून आली आहे.सापडलेल्या दोन्ही गाड्या पोलीसांनी ताब्यात घेतल्या आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.