• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Friday, July 17, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

वीस वर्ष भाजपला संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला संपविणार

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याविरोधात रत्नागिरी भाजपचा आक्रमक पवित्रा

yogesh by yogesh
October 10, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0
वीस वर्ष भाजपला संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला संपविणार

रत्नागिरी : प्रतिनिधी 

ज्याने भाजप संपवण्यासाठी वीस वर्षे प्रयत्न केले आणि हिंदुत्वाची कुचेष्टा केली अशा व्यक्तीला निवडून द्यायचे नाही, असे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज झालेल्या बैठकीत ठरवले. सर्व गोष्टी जाहीर होणार नाहीत, परंतु रत्नागिरीकरांना परिवर्तन हवे आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम राहिलेला नसून परिवर्तनाच्या लाटेत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ सामील होईल, असे पदाधिकाऱ्यांनी ठरवले. रत्नागिरी जिल्ह्यात भाजप एकही जागा लढवणार नाही, अशी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आज महत्त्वाची बैठक भाजप जिल्हा संपर्क कार्यालयात घेण्यात आली.

याप्रसंगी बाळ माने भावनिक झाले आणि म्हणाले की मी ३५ वर्षे भाजपचा निष्ठावंत म्हणून काम करतोय. हिंदुत्वासाठी, पक्षासाठी सर्व ते योगदान दिले आहे. रत्नागिरीकरांना परिवर्तन हवे आहे. परिवर्तन अटळ आहे, ही काळाची गरज आहे. भाजप संपवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले परंतु आजही भाजपची ताकद कमी झाली नाही तर ती वाढतच आहे. खासदार नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाण यांचे पाठबळ भाजपला मिळते आहे. लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी मतदारसंघात परिवर्तन झाले, याचे श्रेय आपल्या कार्यकर्त्यांनाच द्यावे लागेल. आता विधानसभेसाठीही परिवर्तन होणे आवश्यक आहे.

या बैठकीला जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, माजी आमदार बाळ माने यांच्यासमवेत मंडल अध्यक्ष दादा दळी, विवेक सुर्वे, सौ. वर्षा ढेकणे, प्रशांत डिंगणकर, सतेज नलावडे, शहराध्यक्ष राजन फाळके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी सतेज नलावडे यांनी सांगितले की, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाचे मतदान महत्वाचे ठरणार आहे. रत्नागिरीत हिंदुत्वाची कुचेष्टा करणाऱ्यांना मतदान करायचे नाही, अशीच सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे. अशा व्यक्तीला रत्नागिरीकर स्वीकारणार नाहीत. त्यामुळे विधानसभेतील अनुभवी व्यक्तीला निवडून देण्यासाठी कार्यकर्ते तयार आहेत.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सांगितले की, सोयीस्कररित्या आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेणाऱ्या नेत्यांना निवडून द्यायचे नाही, असे कार्यकर्त्यांच्या मनात आहे. सर्वच गोष्टी सांगितल्या जाणार नाहीत. घोडेमैदान दूर नाही. कोकणचे नेते, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रविंद्र चव्हाण हे आपल्याला योग्य ते आदेश देतीलच. आपण आपल्या बूथ कमिट्या सज्ज करूया. कार्यकर्त्यांच्या भावना मी जाणून घेतल्या आहेत. त्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.

Tags: उदय सामंतबाळासाहेब मानेभाजपमहायुतीशिवसेना
ShareSend
Previous Post

हिंदुत्ववादी सरकारचे मुस्लिमधार्जिणे निर्णय

Next Post

इसिस दहशतवादी संघटनेशी संबंधित सहा मुस्लिम गजाआड

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. भैय्या सामंत इफेक्ट : लांजा शहराच्या विकासासाठी २० कोटी मंजूर

July 14, 2026
‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!
माझी रत्नागिरी

‘न्याती’च्या कामाची डुप्लिकेट ख्याती!

July 6, 2026
‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार
माझी रत्नागिरी

‘बार कौन्सिल’च्या विजयानंतर पारिजात पांडे यांचा रत्नागिरीत सत्कार

July 4, 2026
चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार चौकशी स्थगिती : सभासदांचे विधानभवनाबाहेर आंदोलन
माझी रत्नागिरी

चिपळूण नागरी पतसंस्था गैरव्यवहार चौकशी स्थगिती : सभासदांचे विधानभवनाबाहेर आंदोलन

July 4, 2026
Next Post
इसिस दहशतवादी संघटनेशी संबंधित सहा मुस्लिम गजाआड

इसिस दहशतवादी संघटनेशी संबंधित सहा मुस्लिम गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us