• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Tuesday, June 2, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझी रत्नागिरी

कोकणच्या विकासासाठी राज्यपालांना साकडे : बाळ माने

yogesh by yogesh
September 15, 2024
in माझी रत्नागिरी
A A
0
कोकणच्या विकासासाठी राज्यपालांना साकडे : बाळ माने

रत्नागिरी : प्रतिनिधी

कोकणच्या विशेषतः रत्नागिरीच्या प्रादेशिक विकासासाठी राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली. आंबा, काजू बागायतदारांच्या समस्या मांडल्या. मच्छीमारांसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जागतिक पातळीवरचे बंदर उभे राहावे. तसेच कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, चिपळूण- कराड मार्ग, वैभववाडी-कोल्हापूर मार्ग आणि जयगड- डिंगणी मालवाहतूक रेल्वे होण्याकरिता राज्यपालांसोबत सकारात्मक चर्चा केल्याची माहिती माजी आमदार बाळ माने यांनी दिली.

श्री. माने यांनी माजी आमदार राजन तेली, सौ. माधवी माने, मिहिर माने, विराज माने यांच्यासमवेत राज्यपाल राधाकृष्णन् यांची मुंबईतील राजभवनात भेट घेतली. सी. पी राधाकृष्णन यांनी ३१ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. चार दशकांहून अधिक राजकीय, प्रशासकीय अनुभव त्यांच्याकडे आहे. याच अनुषंगाने कोकण विकासाबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे श्री. माने म्हणाले. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतील काही तांत्रिक त्रुटी दूर झाल्या पाहिजेत. मच्छीमारांना रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात जागतिक दर्जाचे बंदर हवे आहे. त्याचबरोबर मत्स्य प्रक्रिया उद्योगांना प्राधान्याने निर्यातीसाठी अधिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी केल्याचे बाळ माने यांनी नमूद केले. यासंबंधी श्री. माने यांनी पत्रकारांना सांगितले की, कोकणात प्रादेशिक विकासाचा असमतोल, प्रलंबित विकास प्रकल्पांविषयी चर्चा केली. राज्य शासनसह केंद्र सरकार, केंद्रीय गृह मंत्रालय, आणि प्रधानमंत्री कार्यालयाकडे राज्यपाल पाठपुरावा करू शकतील. कोकण रेल्वेचे दुपदारीकरण, वैभववाडी- कोल्हापूर रेल्वेमार्ग, चिपळूण ते कऱ्हाड आणि डिंगणी- जयगड मालवाहतुकीसाठी रेल्वेमार्गाबाबत चर्चा केली. याकडे राज्यपाल म्हणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती केली.

श्री. माने म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा, काजू शेतकरी अडचणीत आहेत. बॅंकांची थकित कर्जे आहेत. त्यांना नव्याने कर्ज मिळत नाही. त्यांचे कर्ज माफ व्हावे आणि सवलतीच्या दरात व सीबिल स्कोअर न पाहता विशेष बाब म्हणून आंबा, काजू बागायतदारांना उभे राहण्यासाठी प्रयत्न करावा. हवामानातील बदलामुळे आंबा, काजू पिकाचे रक्षण होत नाहीये. त्याकरिता फवारणीसाठी महागडी औषधे घ्यावी आहेत. त्यामुळे पर्यायी औषधांचे संशोधन व्हावे, ही औषधे कमी किंमतीत मिळावीत, यासाठी आयसीआर यांना राज्यपालांनी सांगावे, अशी विनंती केली आहे. काजूला हमीभाव मिळावा. तसेच आंबा उत्पादक शेतकऱ्याला वाहतूक व पॅकेजिंगसाठी सबसिडी द्यावी, अशी मागणी केल्याचे माने म्हणाले.

Tags: कोकणकोकण विकासबाळ मानेरत्नागिरी
ShareSend
Previous Post

शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवणार

Next Post

मिऱ्या एमआयडीसीला आकसापोटी विरोध : ना. सामंत

yogesh

yogesh

Related Posts

आ.सामंत यांचा दरबार म्हणजेच गतिमान कारभार!
माझी रत्नागिरी

आ. किरण सामंत करणार ‘हरित आणि समृद्ध मतदारसंघ’

June 1, 2026
रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी
माझी रत्नागिरी

रत्नागिरी नगरपरिषदेचा कारभार उधारीवर? १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी

May 22, 2026
ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक
माझी रत्नागिरी

ब्राऊनहेरॉईन बाळगल्याप्रकरणी अरमान धामस्करला अटक

May 2, 2026
पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?
माझी रत्नागिरी

पत्रकार हल्ल्यातील संबंधित भाजपचे पदाधिकारी?

April 22, 2026
Next Post

मिऱ्या एमआयडीसीला आकसापोटी विरोध : ना. सामंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us