लांजा : प्रतिनिधी
लांजा तालुक्यातील साटवली, खानवली येथील तलाठी आणि राजापूर तालुक्यातील मूळच्या भालावली येथील रहिवासी, सारस्वत रत्न जिज्ञा विजयकुमार वागळे यांची एमपीएससीमार्फत घेतलेल्या २०२३ च्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन सहायक कक्ष अधिकारी पदी म्हणून निवड झाली आहे. जिज्ञा वागळे हीच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जिज्ञा वागळे ही विद्यार्थीदशे पासूनच अत्यंत हुशार आणि मेहनती मुलगी चौथी सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत मेरिटमध्ये यश मिळवले होते. दहावीमध्ये शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत जिज्ञा चमकली होती. जिज्ञाची यशाची कमान बहरत होती. पुणे येथे इंजीनियरिंग उच्च शिक्षण घेऊन ती स्पर्धा परीक्षा याची तयारी करत होती. स्पर्धा परीक्षा अभ्यास करता करता महसूल विभागातील तलाठी या पदासाठी तिने परीक्षा देऊन विशेष प्राविण्य मिळवून ती तलाठी या पदावर नोकरी पत्करली. नोकरी करून ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा तयारी करून तिने अखेर महाराष्ट्र मंत्रालय कक्ष अधिकारी परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. ती सध्या लांजा तालुक्यातील साटवली सजा येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे.