• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा हिंदुस्थान

सोने दरात कपात

yogesh by yogesh
July 24, 2024
in माझा हिंदुस्थान
A A
0

रत्नागिरी : प्रतिनिधी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्राचा अर्थसंकल्प आज जाहीर केला. त्यावेळी या अर्थसंकल्पात युवक, महिला आणि शेतकरी यांच्या दृष्टीने मोठी पावलं उचलली दिसून आली. केंद्रीय अर्थमंत्री यांचा सातवा अर्थसंकल्प होता. यावेळी यासह तरुण आणि महिलांच्या उत्थानासाठीही सरकार वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली. यंदाचा अर्थसंकल्प ४७ लाख ६५ हजार ७६८ कोटींचा आहे. सलग सातव्यांदा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. यावेळी या अर्थसंकल्पात तरुणांना लक्ष केल्याचे दिसून आले. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली होती. सोन्याने सारे रेकॉर्ड मोडीत काढत थेट ७३ हजारांचा आकडा गाठला होता. त्यामुळे सोनं सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाकडून सामान्यांच्या खूप अपेक्षा होत्या. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकार ३.० चा पहिला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी एक मोठी घोषणा केली ज्याचा थेट परिणाम हा सामान्य माणसांवर झाला. या निर्णयामुळे सोनं-चांदीच्या दरात मोठी घरसण झाली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोन्यातील कस्टम ड्युटी ६% कमी केल्याची घोषणा अर्थसंकल्पात केली. या घोषणेनंतर काही तासांमध्येच सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मुंबईसह राज्यभरात सोनं आणि चांदी स्वस्त झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार मुंबईत प्रती तोळा ५,९०० रुपये सोनं स्वस्त झालं आहे. तर चांदीच्या दरात ७,६०० रुपये प्रती किलो घसरण झाली आहे. मुंबईत सोमवारी सोन्याचा दर प्रतीतोळा ७३,५०० रुपये इतका होता. हा दर बजेटनंतर थेट ६७,६०० रुपये झाला आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातही सोन्याचे दर २ हजारांनी कमी झाले आहेत.

मुंबई, पुणे आणि जळगावच्या सराफा बाजारात मोठा परिणाम दिसून आला आहे. अर्थसंकल्पानंतर दोन ते तीन तासात सोन्याचे भाव मुंबईत तीन हजारांनी घसरले आहेत. तर पुणे आणि जळगावात तीन हजारांनी सोनं स्वस्त झालं आहे. पुण्यात सोनं खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना प्रतितोळ्यामागे ३ हजार रुपयांचा फायदा झाला. तर मुंबईत सोनं पाच हजारांनी कमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे सोन्यामध्ये प्रतितोळ्यामागे ३ ते ५ हजारांची घट झाली आहे. हे सामान्य नागरिकांना आनंदी करणारं आहे.सोनं-चांदीवरील सीमा शुल्क ६ टक्क्यांवर आणण्यात आलं आहे. तर प्लॅटिनमवरील सीमा शुल्क ६.४ टक्के असणार आहे. त्याशिवाय अमोनिअम नायट्रेटवरील सीमा शुल्क हे ७ टक्क्यावरकुन वाढवून १० टक्के करण्यात आलं आहे.

Tags: दरसोने चांदी
ShareSend
Previous Post

आशा, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना अपघाती मृत्यूसाठी अनुदान

Next Post

कोकण रेल्वेमार्ग होणार दुपदरी!

yogesh

yogesh

Related Posts

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 
माझा हिंदुस्थान

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 

July 23, 2025
तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!
माझा हिंदुस्थान

तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!

July 19, 2025
हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 
माझा हिंदुस्थान

हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 

May 24, 2025
जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी
माझा हिंदुस्थान

जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी

May 24, 2025
Next Post

कोकण रेल्वेमार्ग होणार दुपदरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us