• माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
Monday, April 13, 2026
  • Login
Ratnadarpan
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
No Result
View All Result
Ratnadarpan
No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख
ADVERTISEMENT
Home माझा हिंदुस्थान

छ. शिवाजी महाराजांची महानता कमी करण्याचे हिंदूविरोधी नॅरेटिव्ह!

yogesh by yogesh
June 27, 2024
in माझा हिंदुस्थान
A A
0

सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशनच्या उदय माहूरकर यांचे हिंदू अधिवेशनात प्रतिपादन

पणजी : प्रतिनिधी

दक्षिण गुजरात ते तामिळनाडूच्या जिंजीपर्यंत १६०० किलोमीटर लांबीचे राज्य निर्माण करून मुघल राजवटीच्या अंताची पायाभरणी करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एक मोठे सम्राट आणि राष्ट्रनिर्माते होते; मात्र हिंदुविरोधकांनी त्यांचे महान कार्य दाबून त्यांना एक साधा मराठा योद्धा म्हणून इतिहासात दाखवले गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची महानता कमी करण्याचे काम चालू आहे. आपल्या इतिहासाचे विद्रुपीकरण करून स्वातंत्र्यानंतर बहुसंख्य हिंदूंवर मुघलांचा उदात्तीकरण करणारा खोटा इतिहास लादण्यात आला, असे अनेक हिंदूविरोधी नॅरेटिव्ह आजही निर्माण करून हिंदूंमध्ये संभ्रम, भेद आणि न्यूनगंड निर्माण करून हिंदूंना निष्प्रभ केले जात आहे. याविरोधात हिंदूंनी आता जागे होऊन हिंदूविरोधी नॅरेटिव्ह ओळखले पाहिजे. त्याचा अभ्यास करून या हिंदूविरोधी नॅरेटिव्हचा समाजासमोर भांडाफोड केला पाहिजे, असे प्रतिपादन ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’ संस्थापक, लेखक, इतिहासकार आणि भारताचे माजी माहिती आयुक्त श्री. उदय माहूरकर यांनी केले. ते फोंडा, गोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशना’त श्री विद्याधिराज सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेतील ‘हिंदूविरोधी नॅरेटिव्हला प्रत्युत्तर’ यावर बोलत होते. या वेळी व्यासपिठावर उत्तर प्रदेश येथील ‘प्राच्यम्’चे संस्थापक तथा विचारवंत श्री. प्रविण चतुर्वेदी, हरियाणा येथील विवेकानंद कार्य समितीचे अध्यक्ष तथा विचारवंत श्री. नीरज अत्री आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे हे उपस्थित होते.

यावेळी ‘प्राच्यम्’चे संस्थापक तथा विचारवंत श्री. प्रविण चतुर्वेदी म्हणाले की, जो हिंदु धर्म प्रेम, करुणा आणि वैश्विक बंधुत्वाचे प्रतीक राहिला आहे. त्याची जगभरात बदनामी केली जात आहे. हिंदू युवकांमध्ये विशेषत: संभ्रम व एकमेकांबद्दल तिरस्कार भावना वाढीस लावण्यासाठी जातीयवाद, ब्राह्मणवादी पितृसत्ता असे शब्द तयार केले गेले आहेत. या खोट्या कथानकांचा प्रतिकार फक्त त्यांच्यातील खोटेपणा उघड करूनच करता येईल. उदाहरणार्थ आपल्याकडे जात ही संकल्पना नव्हती, फक्त वर्ण होते; मात्र ब्रिटिशांनी आपल्याला विभाजित करण्यासाठी जात पद्धती तयार केली. यापुढे जाऊन भारत, हिंदु धर्म, संस्कृती आणि हजारो वर्षांमध्ये सर्व क्षेत्रातील हिंदूंनी केलेले कर्तृत्व समाजापुढे मांडावे लागेल.


हिंदूविरोधी नॅरेटिव्हविषयी सांगतांना श्री. माहूरकर पुढे म्हणाले की, ‘हिंदूंना नॅरेटिव्हची (खोट्या कथानकाची) लढाई जिंकायला शिकावे लागेल. हिंदूंच्या सहिष्णु स्वभावामुळे, तसेच विजीगिषु वृत्तीच्या अभावामुळे ते नॅरेटिव्हच्या लढाईत नेहमीच हरत आले आहेत. हे स्वातंत्र्यापासूनचे चित्र आहे. वर्ष २००२ च्या गुजरात दंगलीच्या आधी गोध्रा येथे ज्या साबरमती रेल्वेमध्ये ५९ हिंदू मारले गेले; मात्र मा. नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांनी मुस्लिमविरोधी लाट आणण्यासाठी हे कृत्य घडवून आणल्याचे कम्युनिस्ट आणि इस्लामी रणनीतीकारांनी सांगितले. प्रत्यक्षात मुसलमान जमावाने रेल्वेचे डबे जाळल्याचे गुजरात उच्च न्यायालयाच्या निकालात समोर आले.

विचारवंत श्री. नीरज अत्री म्हणाले की, विकृत कथनकाचा एक पैलू असा आहे की, पूर्णपणे अपयशी आणि विनाशकारी घटना देखील सामाजिक न्याय किंवा समावेशक म्हणून सादर केल्या जातात. याचे अगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे मानवी शरीराचा नाश करणारी ‘जेंडर ॲफिर्मेशन’ नावाची प्रक्रिया ! यात उपचार म्हणून पूर्णपणे अवैज्ञानिक पद्धत मांडली जात आहे. आपला देश, आपला समाज आणि भावी पिढ्या सुरक्षित ठेवता याव्यात यासाठी सखोल अभ्यास आणि संशोधन करूनच योग्य माहिती पोहोचवणे ही माध्यमांची जबाबदारी आहे.

Tags: सनातनहिंदुत्ववादीहिंदुस्थानहिंदूहिंदू अधिवेशनहिंदू जनजागृती समिती
ShareSend
Previous Post

‘कोंकण पदवीधर’साठी ६४.१४ टक्के मतदान

Next Post

हिंदुस्थानात ७० वर्षांवरील नागरिकांना मिळणार मोफत उपचार

yogesh

yogesh

Related Posts

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 
माझा हिंदुस्थान

रत्नागिरीत ‘VIT सेमिकॉन्स’च्या उदघाटनाला मोदीजी येणार! 

July 23, 2025
तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!
माझा हिंदुस्थान

तिकीट बुकिंग नियमांत बदल, दलालांना चाप!

July 19, 2025
हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 
माझा हिंदुस्थान

हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलावीत : आ. टी. राजासिंह 

May 24, 2025
जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी
माझा हिंदुस्थान

जिल्ह्यातून १३ घुसखोर मुस्लिम बांगलादेशींची हकालपट्टी

May 24, 2025
Next Post

हिंदुस्थानात ७० वर्षांवरील नागरिकांना मिळणार मोफत उपचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

No Result
View All Result
  • माझा हिंदुस्थान
  • माझा महाराष्ट्र
  • माझं कोकण
  • माझी रत्नागिरी
  • लेखमाला
  • साहित्य
  • अग्रलेख

© 2024 All Rights Are Reserved RatnadarpanNews Designed By Shubham(7757910341)

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp us